Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कॉंग्रेस आणि थरूर यांनी माफी मागावी: जावडेकर

कॉंग्रेस आणि थरूर यांनी माफी मागावी: जावडेकर

=भाजपा आजपासून शहीद दिवस पाळणार=
prakash_javadekarनवी दिल्ली, [२२ मार्च] – शहिदांचा अपमान करणारे विधान केल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने तसेच या पक्षाचे नेते शशी थरूर यांनी देशवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मंगळवारी केली. भाजपातर्फे उद्यापासून तीन दिवस देशभर शहीद दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर म्हणाले की, देशद्रोहाच्या घोषणा दिल्याचा आरोप असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारची तुलना शशी थरूर यांनी शहीद भगतसिंग यांच्यांशी केली. हा शहिदांचा अपमान आहे. भगतसिंगांनी विदेशी आक्रमकांच्या विरोधात संघर्ष केला होता, तर कन्हैयाकुमारने संसदेवर दहशतवादी हल्ला करणार्‍या अफजल गुरूला शहीद ठरविण्याचा प्रयत्न केला.
शशी थरूर यांनी अशा कन्हैयाकुमारची तुलना शहीद भगतसिंगांशी केल्यामुळे देशवासीयांच्या मनात प्रचंड असंतोष धुमसत आहे, याकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने शशी थरूर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या विधानापासून स्वत:ला दूर केले. पण, याने काम भागणार नाही. शहिदांचा अपमान करणारे विधान केल्याबद्दल थरूर यांच्यासोबत कॉंग्रेसनेही माफी मागितली पाहिजे.
शहिदांचा अपमान करण्याची कॉंग्रेसची संस्कृतीच आहे, याआधी अनेकवेळा कॉंग्रेसने शहीद भगतसिंग यांचा अपमान केला आहे, असा आरोप करीत जावडेकर म्हणाले की, ओपनलर्निंगच्या अभ्यासक्रमात शहीद भागतसिंग यांचा उल्लेख अतिरेकी असा करण्यात आला होता. एवढेच नाही तर, २००७ मध्ये घेण्यात आलेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत क्रांतिकारी अतिरेकी भगतसिंगांची समीक्षा करण्यास सांगण्यात आले होते.
कॉंग्रेसने आधी १२ वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. आता दोन वर्षांपासून मोदी सरकारच्या विकासकामांना विरोध केला जात आहे. कॉंगे्रसने आधी देशद्रोही घोषणांचे समर्थन केले आणि आता शहिदंाचा अपमान केला जात आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पोस्टरवर कन्हैयाकुमारचा फोटो वापरून कॉंग्रेसने आपल्या राजकीय दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे, असा आरोप करीत, केरळमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शशी थरूर यांनी असे विधान जाणिवपूर्वक केले आहे. आमच्या सरकारवर कितीही टीका केली तरी चालेल, पण भाजपा शहिदांचा अपमान कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
२३ मार्चला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती, त्यामुळे उद्यापासून तीन दिवस देशभर शहीद दिन पाळण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. २३ मार्चला भाजपा कार्यकर्ते गावागावात शहीद दिन पाळतील. शहीद भागतसिंगांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून मान्यवरांची भाषणे होतील. २४ मार्चला देशभर ‘रंग दे बसंती चोला’ हे गीत सामूहिकपणे म्हटले जाईल. २५ मार्चला आक्रोशदिन पाळला जाणार असून, या दिवशी शहिदांचा अपमान करणार्‍या मानसिकतेचे पुतळे जाळले जातील, असेही जावडेकर यांनी जाहीर केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27536

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (586 of 2453 articles)


इंदूर, [२२ मार्च] - भारतीय संस्कृतीतील गाईचे महत्त्व विशद करण्यासाठी देशातील १३ आखाड्यांच्या साधूंनी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे एकत्र येत, गोमूत्र ...

×