Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कॉंग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचे कारस्थान: ऍण्टोनी

कॉंग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचे कारस्थान: ऍण्टोनी

ak-antonyनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोडसाळ असून हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप माजी संरक्षण मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. ऍण्टोनी यांनी केला आहे.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यानंतर संसदभवनात आयोजित पत्रपरिषदेत, हा घोटाळा झाला तेव्हा संपुआ सरकारमध्ये संरक्षणमंत्री असलेले ऍण्टोनी म्हणाले की, दोन वर्षांचा आपला गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा लपवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर असे आरोप करण्यात येत आहेत. केंद्र सरकार दोन वर्षे झोपले होते का, अशी विचारणाही त्यांनी केली.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात लाच देण्यात आली, हे दिसून येताच आमच्या सरकारने सर्वप्रथम या कंपनीशी केलेला खरेदीचा व्यवहार रद्द केला. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देत या कंपनीला काळ्या यादीतही टाकले. जेणेकरून या कंपनीशी कधीच कोणत्याही प्रकारे व्यवहार कोणाला करता येणार नाही. एवढेच नव्हे तर याप्रकरणी खरेदीसाठी देण्यात आलेली अग्रीम राशीही व्याजासह वसूल केली. संपुआ सरकारने २०६८ कोटी रुपये कंपनीकडून परत घेतले, एवढेच नाही तर या कंपनीचे तीन हेलिकॉप्टर जप्त केले.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीला आम्ही काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली होती, तसे अंतरिम आदेशही देण्यात आले होते, याकडे लक्ष वेधत ऍण्टोनी म्हणाले की, मात्र २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने या कंपनीला मेक इन इंडियात सहभागी करून घेण्यासाठी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचा आक्षेप डावलत काळ्या यादीतून बाहेर काढले. एवढेच नाही तर नौदलासाठी १०० हेलिकॉप्टर घेण्याचा करार याच कंपनीशी करण्याचा मार्ग मोकळा केला.
सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांच्या काळात मोदी सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी का पूर्ण केली नाही, अशी विचारणाही ऍण्टोनी यांनी केली. यावेळी उपस्थित असलेले कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदी सरकारवर दहा प्रश्‍नांची सरबत्ती करत त्याची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी देण्याची मागणी केली
कॉंगे्रसने स्पष्टीकरण द्यावे – जावडेकर यांची मागणी
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा संपुआ सरकारच्या घोटाळ्यांच्या मालिकेतील आणखी एक घोटाळा असल्याचे इटलीतील न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले असल्याने कॉंगे्रस नेतृत्वाने यावर देशाला स्पष्टीकरण द्यायलाच हवे, अशी जोरदार मागणी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याच्या चौकशीतून जे काही समोर आले आहे, ते धक्कादायक आणि तितकेच गंभीरही आहे. त्यामुळे नेमके सत्य काय आहे, हे देशाला कळायलाच हवे आणि ही जबाबदारी कॉंगे्रस नेतृत्वालाच पार पाडावी लागणार आहे, असे जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्वत:चे घोटाळे लपवून संसदेचे कामकाज रोखण्यापेक्षा, सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आपण देशासाठी काय केले, देशाला काय दिले, याबाबत कॉंगे्रसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सोबतच, हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात पक्षाचे कोणकोणते नेते सहभागी आहेत, याचेही स्पष्टीकरण द्यायला हवे. सत्य समोर आणण्यासाठी या मुद्यावर विस्तृत चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही जावडेकर यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28038

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (422 of 2453 articles)


[caption id="attachment_28036" align="alignleft" width="300"] New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. PTI Photo ...

×