Home » उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय » कॉल ड्रॉपची भरपाई लगेच द्या

कॉल ड्रॉपची भरपाई लगेच द्या

=ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना निर्देश=
traiनवी दिल्ली, [३ जानेवारी] – दूरसंचार कंपन्यांनी कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल ग्राहकांना लगेच त्याची नुकसान भरपाई द्यावी. नियमानुसार नव्या वर्षापासून ही प्रक्रिया कटाक्षाने सुरू करण्यात यावी, असे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहेत.
कॉल ड्रॉप झाल्यानंतरही ग्राहकांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्यास अनेक दूरसंचार कंपन्या टाळाटाळ किंवा विलंब करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अशा कंपन्यांविरुद्ध मोठा आर्थिक दंड लादण्याचे ट्रायने ठरविले होते. कॉल ड्रॉप झाल्यानंतर ग्राहकाकडून पूर्ण पैसे वसूल करण्याच्या दूरसंचार कंपन्यांच्या धोरणावर आळा घालण्याच्या अनुषंगाने, कॉल ड्रॉपच्या स्थितीत प्रति कॉल एक रुपया कंपन्यांना ग्राहकांना आर्थिक दंड म्हणून द्यायलाच हवा, असे धोरणच ट्रायने स्वीकारले असल्याची माहिती ट्रायच्या सूत्राने दिली.
देशातील सर्व कंपन्यांना आपल्या ग्राहकांना हा आर्थिक दंड द्यावा लागणार आहे. सोबतच, ज्या दूरसंचार कंपन्या ट्रायच्या निर्देशांचे पालन करणार नाही, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या प्रस्तावावरही ट्राय गंभीरपणे विचार करीत असल्याचे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26396

Posted by on Jan 4 2016. Filed under उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उद्योग, ठळक बातम्या, राष्ट्रीय (945 of 2453 articles)


=तयारी अंतिम टप्प्यात= पिंपरी, [२ जानेवारी] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पुण्यातील मारुंजी या गावी उद्या रविवार ...

×