Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » कोट्यवधी रुपये रुग्णवाहिकेतून मुंबईहून कोलकात्यात

कोट्यवधी रुपये रुग्णवाहिकेतून मुंबईहून कोलकात्यात

=भुजबळांची अशीही लबाडी, ईडीच्या चौकशीतून समोर आली माहिती=
Chagan-Bhujbal3मुंबई, [१५ मार्च] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीत केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घोटाळ्यांमधून प्राप्त केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम मुंबई ते कोलकाता चक्क रुग्णवाहिकेतून नेली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी छगन भुजबळ यांची तब्बल ११ तास कसून चौकशी केली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना औपचारिकपणे अटक केली. या चौकशीतून भुजबळांच्या घोटाळ्यांचे अनेक रंजक किस्से बाहेर आले आहेत.
मोठमोठे घोटाळे केल्यानंतर आपण आणि कुटुंबातील कोणताही सदस्य चौकशीच्या विळख्यात अडकणार नाही, याची काळजी घेताना भुजबळ यांनी घोटाळ्यातील अमाप पैसा रुग्णवाहिकेत भरून मुंबईहून कोलकात्याला पाठविला होता. त्यानंतर पश्‍चिम बंगाल आणि बाहेर असलेल्या काही विशिष्ट कंपन्यांच्या खात्यात हा सर्व पैसा जमा करण्यात आला. या कंपन्यांनी या पैशाचा वापर भुजबळांच्याच मालकीच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याकरिता केला. घोटाळ्यातील आपला पैसा पुन्हा घरातच परत आणण्यासाठी भुजबळांनी ही शक्कल लढविली होती.
विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांचा रुग्णवाहिकेतील हा प्रवास सकाळी सुरू होऊन सायंकाळी संपला होता. अर्थात सायंकाळपर्यंत हा संपूर्ण पैसा भुजबळांच्या घरात आला होता, असे चौकशीतून उघड झाले. या व्यवहाराच्या संपूर्ण नोंदी ईडीकडे असून, त्या आधारावरच ईडीच्या अधिकार्‍यांनी भुजबळांवर प्रश्‍नांची सरबत्ती झोडली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27350

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (648 of 2451 articles)


=विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले= मुंबई, [१५ मार्च] - आम्ही सूडाचे राजकारण करणार नाही. पण घोटाळ्याचे पुरावे असतील, तर कुणालाही सोडणार ...

×