Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » कोणतेही व्यासपीठ निषिद्ध नाही : नरेंद्र जाधव

कोणतेही व्यासपीठ निषिद्ध नाही : नरेंद्र जाधव

=समरसता साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन=
Dr. NARENDRA JADHAVडॉ. आंबेडकर साहित्य नगरी (कल्याण), [३० जानेवारी] – या व्यासपीठावर जाऊ नये, यासाठी निषेध करणारे संदेश, ई-मेल आणि कॉल्स मोठ्या प्रमाणावर आपल्याला आले. परंतु, बाबासाहेब माझा अभ्यासाचा विषय नसून ध्यासाचा विषय असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याविषयी कुठेही, कधीही आणि कोणत्याही व्यासपीठावर चर्चा होत असेल तर माझ्यासाठी ते व्यासपीठ निषिद्ध नाही, अशी चपराक पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू , प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांचे नाव घेऊन समाजात दुफळी निर्माण करणार्‍यांना लगावली.
समरसता साहित्य परिषद व श्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्थेच्या विद्यमाने आयोजित १७ व्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. यावेळी ते बोलत होते. जाधव म्हणाले, स्त्रियांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी आवाज उठविणारे आणि स्त्री-पुरुष भेदभाव दूर करण्यासाठी मंत्रिपदाचा त्याग करणारे पहिले परिवर्तनवादी नेते बाबासाहेब होते. त्यांनी संपूर्ण स्त्रीजातीसाठी आवाज उठवला, केवळ दलित स्त्रियांसाठी नव्हे. त्यामुळे बाबासाहेबांना केवळ दलितांचे नेते म्हणणे अत्यंत अन्यायकारक आहे.
विचार कृतीत आणणारे कृतिवीर : रमेश पतंगे
१९२० सालापूर्वी राष्ट्रजीवनात कोठेच नसलेला समाजाच्या तळागाळातील माणूस आणि जातव्यवस्थेच्या उतरंडीतील शेवटच्या पायरीवरचा माणूस कोठेच नव्हता. त्याला बरोबर घ्यायलाच कोणी तयार नव्हते. हा प्रश्‍न बाबासाहेबांना महत्त्वाचा वाटला. ते म्हणाले, हा देश माझा आहे, येथील संस्थाजीवन माझे आहे, देशाची सार्वजनिक मालमत्ता माझी आहे, अशी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा तिला राष्ट्रीय भावना म्हणतात आणि तीच भावना बाबासाहेबांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, नव्हे तो कृतीत उतरवला. त्यांनी जे जे ठरवले ते करून दाखविले. त्यामुळे बाबासाहेब हे विचार कृतीत आणणारे कृतिवीर असल्याचे उद्गार रमेश पतंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून काढले.
राष्ट्रासाठी वंचित असणार्‍या करोडो लोकांना राष्ट्रजीवनात सहभागी करून घेण्याची व्यवस्था उत्पन्न करून जी राष्ट्रसेवा बाबासाहेबांनी केली त्याचे मोल नाही, असेही ते म्हणाले.
गाडगेबाबा, शाहू, फुले, डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार या समरसतेच्या मानदंडांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष कल्याण पूर्वचे आ. गणपत गायकवाड, संमेलनाध्यक्ष साहित्यिक रमेश पतंगे, माजी संमेलनाध्यक्ष साहित्यिकशेषराव मोरे, निमंत्रक विजय राठोड, सहनिमंत्रक ईश्‍वर पवार, संमेलन कार्यवाह तानाजी सहाणे, महापौर राजेंद्र देवळेकर आणि पहिल्या साहित्य संमेलनाचे कार्यवाह राहिलेले रमेश महाजन उपस्थित होते.
यावेळी शेषराव मोरे यांच्याकडून रमेश पतंगे यांनी संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. याप्रसंगी म. गांधी, तसेच माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यासह विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विदर्भ वेगळा व्हावा, ही बाबासाहेबांची इच्छा!
१९५५ साली भाषावार प्रांत रचनेचा विषय जेव्हा आला तेव्हा बाबासाहेबांनी काही राज्यांची विभागणी सुचविली होती. उत्तरेकडील राज्यांचे विभाजन करा, अन्यथा उत्तर दक्षिण संघर्ष अटळ आहे. उत्तरेकडील राज्य बिहारचे विभाजन सुचविले होते. ते २००० साली झारखंड निर्माण झाले. दुसरे सुचविलेले मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे विभाजन २००२ मध्ये झाले. त्यांनी उत्तर प्रदेशचे त्रिभाजन करण्याचेही सुचविले होते. मात्र, ते अजूनही झालेले नाही. यासोबतच बाबासाहेबांनी महाराष्ट्राचे चार भाग करून चार छोटी राज्ये निर्माण करावी असे सुचवून, विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी जोरकसपणे पाठिंबा त्याकाळी दिला होता. ही वैदर्भीयांसाठी खुशखबरच असल्याचे मत यावेळी संमेलनाचे उद्घाटक डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26674

Posted by on Jan 31 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (865 of 2451 articles)


नवी दिल्ली, [३० जानेवारी] - संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा निश्‍चित करण्यासाठी येत्या गुरुवार ४ फेबु्रवारी रोजी संसदीय कामकाजावरील कॅबिनेट ...

×