Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » कोलगेट: अंतिम निर्णय मनमोहनसिंग यांचाच

कोलगेट: अंतिम निर्णय मनमोहनसिंग यांचाच

=दासरी नारायण राव यांची साक्ष=
ManmohanSinghनवी दिल्ली, [२२ मे] – कॉंगे्रस खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदल यांना झारखंडमधील कोळसा खाणीचे वाटप करण्याचा तसेच अन्य कंपन्यांना कोळसा खाणी देण्याचा अंतिम निर्णय हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचाच होता, अशी साक्ष या घोटाळ्यात आरोपी असलेले माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव आणि केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने आज शुक्रवारी स्थानिक विशेष सीबीआय न्यायालयात दिली.
२००७ मध्ये कोळसा मंत्रालयाचा पदभार मनमोहनसिंग यांच्याकडेच होता. दासरी नारायण राव हे या खात्याचे राज्यमंत्री होते. जिंदल यांच्या स्टील कंपनीलाच झारखंडमधील कोळसा खाण मिळावी, यासाठी परवाना प्रक्रियेत आपल्या मर्जीनुसार फेरफार करणार्‍या ‘त्या’ १० लोकांमध्ये स्वत: जिंदल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांचाही समावेश होता, असे राव यांनी आपल्या साक्षीत स्पष्ट केले. गुप्ता यांनीही न्यायालयात अशाच प्रकारची साक्ष दिली असल्याने मनमोहनसिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
परवाना प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतर जिंदल यांच्या कंपनीला कोळसा खाण देण्याचा अंतिम निर्णय हा कोळसा मंत्री म्हणून मनमोहनसिंग यांनीच घेतला होता, असेही राव आणि गुप्ता यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी, सीबीआयने मनमोहनसिंग यांच्या हेतूविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. पण, न्यायालयाने सीबीआयची भूमिका अमान्य करताना त्यांचीही साक्ष नोंदविण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे, प्रख्यात उद्योगपती कुमारमंगलम् बिर्ला यांच्या कंपनीलाही कोळसा खाणीचे वाटप करण्याचा निर्णय मनमोहनसिंग यांचाच होता, असेही सीबीआयच्या चौकशीत आढळून आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22634

Posted by on May 22 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1676 of 2453 articles)


=विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड, पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा= चेन्नई, [२२ मे] - अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा ...

×