Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » कोळसा, खाण विधेयकावरील समितीचा अहवाल सादर

कोळसा, खाण विधेयकावरील समितीचा अहवाल सादर

=राज्यसभेत गोंधळ, कामकाज स्थगित=
rajyasabhaनवी दिल्ली, [१८ मार्च] – कोळसा खाण तसेच खाण आणि खनिज (विकास आणि विनिमय) विधेयकावर प्रवर समितीने आपला अहवाल आज बुधवारी सादर केल्यामुळे राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा स्थगित करावे लागले.
खाण आणि खनिज विधेयक भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वातील प्रवर समितीकडे पाठवण्यात आले होते. या समितीने आपला अहवाल बुधवारी सभागृहात सादर केला. कोळसा खाण विधेयक अनिल माधव दवे यांच्या नेतृत्वातील प्रवर समितीकडे पाठवण्यात आले होते. प्रवर समितीत या दोन्ही विधेयकांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर समितीने आपला अहवाल राज्यसभेत सदार केला. यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा यांनी जोरदार आक्षेप घेतला. कॉंग्रेस सदस्य वेलमध्ये येत घोषणा देऊ लागले. यात प्रमोद तिवारी, हनुमंत राव, मधुसूदन मिस्त्री आणि अन्य सदस्य आघाडीवर होते. सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवर समितीत या विधेयकावर पुरेशी चर्चा झाली नाही, चर्चेसाठी आणखी वेळ द्यायला हवा होता, अशी कॉंग्रेसच्या सदस्यांची भूमिका होती. या दोन्ही विधेयकांचा संबंध राज्य सरकार, तसेच पर्यावरण मंत्रालयाशी येतो, त्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा या सदस्यांचा आक्षेप होता.
प्रवर समितीच्या बैठकीत आम्हाला पुरेशी चर्चा करता आली नाही, असा विरोधकांचा आक्षेप असल्यामुळे या दोन्ही विधेयकांवर चर्चेसाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी या सदस्यांची मागणी होती.
उपसभापती पी. जे. कुरियन संतप्त सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सदस्यांचे समाधान होत नव्हते. तुमचे जे आक्षेप आहेत, ते विधेयकावरील चर्चेच्या वेळी मांडा, असे कुरियन म्हणाले. विधेयकावर तुमचे जे आक्षेप होते, त्याची चर्चा तुम्ही प्रवर समितीच्या बैठकीत करायला हवी होती, असे कुरियन म्हणाले. आता दोन्ही विधेयकांवर प्रवर समितीने आपला अहवाल सादर केला आहे, त्यामुळे तुम्हाला बोलता येणार नाही, असे कुरियन म्हणाले. मुख्तार अब्बास नकवीही बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गोंधळामुळे काही ऐकू येत नव्हते. अखेर कुरियन यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
दोन्ही विधेयकावरील प्रवर समितीचा अहवाल सभागृहात सादर झाल्यामुळे आता सभागृहात या दोन्ही विधेयकांवर चर्चा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21587

Posted by on Mar 19 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1876 of 2453 articles)


=सरकार देणार अखेरची संधी, अन्यथा दहा वर्षांचा कारावास, ३०० टक्के दंड= नवी दिल्ली, [१८ मार्च] - देशविदेशात काळा पैसा जमा ...

×