Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगही आरोपी

कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगही आरोपी

=विशेष न्यायालयाने बजावला समन्स, बिर्ला, पारख यांच्यासह अन्य तिघांचाही समावेश=
ManmohanSinghनवी दिल्ली, [११ मार्च] – लाखो कोटी रुपयांच्या कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून हजर होण्याचा समन्स जारी केला आहे. त्यांच्यासोबतच उद्योगपती कुमारमंगलम् बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्यासह आणखी तिघांनाही समन्स बजावण्यात आला आहे. २००५ मध्ये ओडिशातील तालाबिरा कोळसा खाणीच्या वाटपाशी संबंधित हे प्रकरण आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पाराशर यांनी मनमोहनसिंग यांच्यासह अन्य पाच जणांना येत्या ८ एप्रिल रोजी आरोपी म्हणून न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला आहे. भादंविच्या कलम १२०- ब (फौजदारी स्वरूपाचा कट) आणि कलम ४०९ (सरकारी नोकराने केलेला विश्‍वासघात) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींतर्गत हा समन्स बजावण्यात आला असून, या आरोपांमध्ये दोषी आढळून आल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
मनमोहनसिंग, बिर्ला आणि पारख यांच्याव्यतिरिक्त हिंडाल्को कंपनी व कंपनीचे दोन अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी. भट्टाचार्य यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे. गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी सीबीआय न्यायालयाने मनमोहनसिंग यांचे बयाण नोंदविण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. २००५ मध्ये जेव्हा या खाणीचे वाटप करण्यात आले होते, त्यावेळी मनमोहनसिंग यांच्याकडेच कोळसा मंत्रालयाचा प्रभार होता.
सीबीआयने आपल्या आरोपपत्रात बिर्ला, पारख, हिंडाल्को आणि कंपनीच्या अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तथापि, नंतर सीबीआयने आरोपींविरुद्धचे हे प्रकरण बंद करण्याचा अहवालही (क्लोजर रिपोर्ट) सादर केला होता. मात्र, तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला होता. कॅगने आपल्या अहवालात कोळसा खाणवाटपात सरकारच्या तिजोरीला १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचा ठपका ठेवला होता.
दु:खी व निराश
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने बजावलेल्या समन्समुळे मी दु:खी आणि निराश आहे, पण कोणत्याही चौकशीचा सामना करण्याची माझी तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मनमोहन सिंग यांनी दिली. चौकशीनंतर सत्य समोर येईलच, असा मला विश्‍वास आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21282

Posted by on Mar 12 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1933 of 2453 articles)


=एकनाथ खडसे यांची विधानसभेत घोषणा= मुंबई, [११ मार्च] - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी सध्या ...

×