Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » क्रिकेट सट्टा काळ्या पैशाचा सर्वात मोठा स्रोत

क्रिकेट सट्टा काळ्या पैशाचा सर्वात मोठा स्रोत

=एसआयटीचा तिसरा धक्कादायक अहवाल=
sit logoनवी दिल्ली, [१३ मे] – क्रिकेट सामन्यांवर लावण्यात येणारा सट्टा हाच देशातील काळ्या पैशाची निर्मिती करणारा सर्वात मोठा स्रोत आहे, असा धक्कादायक अहवाल सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज बुधवारी सादर केला. सोबतच, या बेटिंग व सट्टेबाजीवर तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे मतही नोंदविले.
एसआयटीचा या प्रकरणातील हा तिसरा अहवाल आहे. या अहवालानुसार आतापर्यंत क्रिकेटवरील सट्ट्यांमध्ये सुमारे तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हवाला आणि बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत १९१८ प्रकरणांची चौकशी पूर्ण केली आहे आणि एसआयटीच्या निर्देशावरून ईडीने आतापर्यंत ३६० कोटी रुपये किमतीच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
आपल्या अहवालात एसआयटीने म्हटले आहे की, फ्रान्समध्ये एचएसबीसी बँकेत एकूण ६२८ भारतीयांची खाती आहेत. या खात्यांपैकी २८९ खात्यांची सविस्तर माहिती एसआयटीला मिळू शकली नाही. तर, उर्वरित ३३९ खात्यांमध्ये सुमारे २०० कोटी रुपये जमा आाहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22537

Posted by on May 14 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1698 of 2453 articles)


मुंबई, [१३ मे] - राज्यातील ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांचा चीनचा दौरा करणार आहेत. ...

×