Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » खग्रास चंद्रग्रहण बुधवारी

खग्रास चंद्रग्रहण बुधवारी

=पूर्व भागात जा; सूर्य, पृथ्वी, चंद्राची लपाछपी पाहा=
lunar.eclipseइंदूर, [४ ऑक्टोबर] – या वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण येत्या ८ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या मते सूर्य, पृथ्वी आणि चंद्रातील लपाछपीचा मनमोहक खेळ जर बघायचा असेल, तर देशाच्या पूर्व भागाचा दौरा करायलाच हवा.
भारतीय वेळेनुसार बुधवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ४४ मिनिटांनी या चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तर, सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटे ७ सेकंदपर्यंत हे ग्रहण कायम राहील. त्याचप्रमाणे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या त्रिमूर्तीचा रोमांचकारी खेळ दाखविणारा हा खगोलीय घटनाक्रम सुमारे तीन तास २० मिनिटांपर्यंत सुरू राहील, अशी माहिती येथील एका वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञाने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या चंद्रग्रहणाच्या वेळी जवळपास २३ मिनिटे चंद्र पृथ्वीच्या छायेत पूर्णत: झाकोळून जाईल. भारतात खग्रास चंद्रग्रहणाचे सर्वात सुंदर आणि मनोहारी चित्र पूर्वोत्तर भागात दिब्रुगड, इम्फाळ आणि कोहिमा यासारख्या शहरात दिसण्याची शक्यता आहे. या भागांत देशातील इतर भागांच्या तुलनेत चंद्रोदय लवकर होतो.
हे चंद्रग्रहण या वर्षातील दुसरे आणि शेवटचे राहणार आहे. या वर्षातले पहिले खग्रास चंद्रग्रहण १५ एप्रिल रोजी लागले होते. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण लागते. हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायला काहीच हरकत नाही, असे खगोल शास्त्रज्ञांचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=17082

Posted by on Oct 5 2014. Filed under ठळक बातम्या, विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विज्ञान भारती (2367 of 2466 articles)


पुणे, [२ ऑक्टोबर] - गाजलेल्या चित्रपट गीतांमुळे आणि आपल्या सुरेलआवाजामुळे रसिकांच्या मनात जागा मिळविणारे ख्यातनाम पार्श्‍वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे वयाच्या ...

×