Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » खचून न जाता जनतेत सक्रिय रहा

खचून न जाता जनतेत सक्रिय रहा

=पराभूत उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला=
devendrafadnavisमुंबई, [१४ जानेवारी] – विधानसभेच्या बहुरंगी लढतीत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे, मात्र पराभूत झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचे सांत्वन करून, पराभवाने खचून न जाता पक्षाच्या माध्यमातून जनतेत सक्रिय रहावे, असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिला.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मात्र, पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक मुंबईत विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, सरचिटणीस व सदस्यता प्रमुख सुजितसिंह ठाकूर, सहसंघटनमंत्री राजेंद्र फडके, सदस्यता सहप्रमुख व प्रदेश सचिव सुनील बढे व प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
पराभव झालेल्या उमेदवारांकडे कुणीच लक्ष देत नसल्याची यापूर्वी असलेली ओरड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढत, पराभूत होण्याची कारणमीमांसा या बैठकीत केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची अखेरच्या क्षणाला युती तुटल्याने भाजपाने मित्रपक्षांसह सर्व जागांवर निवडणूक लढवली होती. या बहुरंगी लढतीत पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून उमेदवारांनी ताकदीने निवडणूक लढविली. मात्र, निसटता पराभव झाला. तरीही राज्यात सरकार आले असल्याने पराभवात खचून न जाता ज्या मतदारांनी विश्‍वास ठेवून मतदान केले त्यांच्यासह उर्वरित मतदारांसाठी पुन्हा ताकदीने काम करावे. पराभव जरी पत्करावा लागला तरी सरकारला मार्गदर्शन आणि सूचना करून जनतेच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतल्याने परिवर्तन होऊन पुन्हा संधी मिळू शकते. त्यामुळे खचून न जाता जोमाने काम करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पराभूत उमेदवारांना देऊन, त्यांचा पक्ष कामासाठी उत्साह वाढवला.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की, युतीशिवाय लढण्याचा निर्णय आयत्या वेळी झाला. तरीही पक्षाच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत खूप चांगली लढत दिली. जे उमेदवार विजयी झाले नाहीत त्यांनी पुढची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन सतत जनसंपर्क ठेवावा. आपण जिंकू शकतो या जिद्दीने काम करावे. पक्षाच्या सदस्यता महाअभियानाच्या माध्यमातून या उमेदवारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात शेवटच्या बुथपर्यंत सदस्य नोंदणी करून घ्यावी व संपर्क वाढवावा. लोकांपर्यंत जाण्याची ही खूप चांगली संधी आहे. त्यासाठी सात दिवस सदस्य नोंदणीचा एककलमी कार्यक्रम राबवावा.
पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम राज्यासह देशभरात सुरू असून, या सदस्य नोंदणीत प्रत्येक आमदार आणि सदस्यांनी भाग घेऊन राज्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19714

Posted by on Jan 15 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2232 of 2451 articles)


=पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा नाकारला= श्रीनगर, [१४ जानेवारी] - जम्मू-काश्मीरमध्ये लोकप्रिय सरकार स्थापन करण्यात निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सने ...

×