Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » खाजगी रुग्णालयांमधून शासकीय वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा: मुख्यमंत्री

खाजगी रुग्णालयांमधून शासकीय वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा: मुख्यमंत्री

FADNAVIS_DEVENDRAपुणे, [२७ नोव्हेंबर] – खाजगी रुग्णालयांतूनही शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी रुग्णालयांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
वाकड येथील लाईफ पॉईंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, आमदार लक्ष्मण जगताप, बाळासाहेब भेगडे, लाईफ पॉईंट हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. सुरेश संघवी, संचालक डॉ. शोभा संघवी, डॉ. कैलास बोथारे, डॉ. प्रतिभा बोथारे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कोणत्याही अपघातातील रुग्णांसाठी अपघातानंतरचा गोल्डन अवर कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या कालावधीत त्याला गतीने वैद्यकीय सेवा व उपचार मिळाल्यास त्याचे प्राण निश्‍चितच वाचू शकतात. दररोज सुमारे ६० हजारांहून अधिक वाहने पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करतात. वाहतूक वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघातग्रस्तांना पुणे शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कराव्या लागणार्‍या धावपळीमध्ये गोल्डन अवर निघून जातो व त्यामुळे जिवाला नाहक धोका निर्माण होतो. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लाईफ पॉंईंट हॉस्पिटलमुळे या परिसरातील अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळू शकतील.
या परिसरात अपघातग्रस्तांना कमीत कमी वेळेत तातडीची वैद्यकीय मदत या रुग्णालयात मिळाली पाहिजे. रुग्णालयानेही चांगली सेवा देऊन आपल्या प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचविण्याचा प्रयत्न करावा. शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही फडणवीस यांनी केल्या.
पालकमंत्री बापट म्हणाले, राज्य शासनाच्या राजीव गांधी आरोग्य योजनेत समावेशासाठी रुग्णालयाने प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी रुग्णालयातर्फे जलयुक्त शिवार अभियानसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. प्रारंभी फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाचे उद्घाटन केले व नंतर विविध कक्ष व सेवा-सुविधांची पहाणी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25785

Posted by on Nov 28 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1134 of 2451 articles)


=ब्रिटिश वैमानिक ट्रेसी टेलर यांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [२७ नोव्हेंबर] - स्त्री, मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असो, आपल्या ...

×