Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » खासदार विकास निधीत वाढ होणार

खासदार विकास निधीत वाढ होणार

=सरकारचे लोकसभेत संकेत=
vk_singhनवी दिल्ली, [९ मार्च] – खासदारांना त्यांच्या मतदारसंघात जास्तीतजास्त विकासात्मक कामे करता यावी, यासाठी त्यांना दिल्या जाणार्‍या निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावावर अर्थमंत्रालय गंभीरपणे विचार करीत आहे. तथापि, यावर अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती सरकारतर्फे आज बुधवारी लोकसभेत देण्यात आली.
खासदार विभाग विकास निधीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चाही झाली आहे. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आल्यानंतर संसदेला माहिती देण्यात येईल, असे सांख्यिकी व कार्यक्रम अंबलबजावणी खात्याचे मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रश्‍नोत्तराच्या काळात एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. खासदार विभाग विकास निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावाचे काय झाले, असा प्रश्‍न त्यांना काही सदस्यांनी विचारला होता.
भाजपाचे सुभाष ब्रह्मे म्हणाले की, महाराष्ट्रातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास करता यावा, यासाठी दरवर्षी दोन कोटी रुपये मिळतात. तिथेच, एका लोकसभा मतदारसंघात सहा ते सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असतानाही खासदारांना मात्र पाच कोटी रुपयेच मिळत असतात. अशा स्थितीत खासदारांच्या विकास निधीत वाढ करण्याची नितांत गरज आहे. अन्य राजकीय पक्षांच्या सदस्यांनी ब्रह्मे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आणि विकास निधीत तातडीने वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27178

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (713 of 2453 articles)


=स्वांत रंजन यांची भूमिका= नागौर, [९ मार्च] - फार पूर्वीपासूनच हिंदू राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे भारताला आणखी सक्षम ...

×