Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » खुशाल तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही

खुशाल तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही

=सुप्रिया सुळे यांची भूमिका=
SUPRIYA_SULE1नवी दिल्ली, [१६ मार्च] – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन आणि अन्य घोटाळ्यांप्रकरणी करण्यात आलेली अटक राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. आमच्या पक्षातील प्रत्येकाला तुरुंगात टाका… आम्ही मराठे आहोत, कधीच घाबरणार नाही आणि डगमगणारही नाही, अशी भूमिका या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बुधवारी विशद केली.
छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे हेदेखील तुरुंगात जातील, असे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी उपरोक्त वक्तव्य केले.
किरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमे त्यांची वक्तव्ये उचलून धरतात. टीका करणारी व्यक्ती भारदस्त असायलाच हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो, याचा अर्थ त्यांनी आम्हाला ‘पप्पू’ समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत प्रचंड आदर आहे, असे सुळे यांनी सांगितले.
सरकारने आम्हाला तुरुंगात डांबले, तरीही आम्ही घाबरणार नाही… आम्ही मराठे आहोत, अन्यायाविरोधात शांत बसणार नाही, आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली की नाही, हे नंतर स्पष्ट होईलच. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस छगन भुजबळ आणि समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27381

Posted by on Mar 17 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (636 of 2451 articles)


=होळीवरही दुष्काळाचे सावट, कोरडी होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन= मुंबई, [१६ मार्च] - गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनचा पाऊस अतिशय कमी ...

×