खेळात सुधारणा हवीः मेस्सी
Wednesday, June 18th, 2014रिओ डी जानेरिओ, [१७ जून] – विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेहमीच दडपण असते. त्यातही स्पर्धेची विजयी सुरुवात करीत तीन गुण प्राप्त करणे ही घटना नेहमीच आनंद देणारी असते. विजय मिळवित आगेकूच करायला मिळाल्याने छान वाटत आहे.
स्पर्धेची योग्य ती सुरुवात करण्यास आम्हाला काही अडचणी येत होत्या. त्यामुळे काहीशी चिंता वाटत होती. पण, अखेर या सामन्यात तीन गुण मिळविण्यास आम्ही यशस्वी ठरलो असे मत विश्व विख्यात अर्जेटिनाचा खेळाडू लिओनेल मेस्सी याने व्यक्त केले. स्पर्धेत आगेकूच करायची असल्यास आम्हाला आमच्या खेळातील कौशल्यात लगेचच सुधारणा करणे गरजेचे आहे याकडेही त्याने लक्ष वेधले.
मरकाना स्टेडियमवर पहिल्यांदाच खेळण्याचा अनुभव कसा होता याविषयी विचारले असता मेस्सी म्हणाला की, मी जशी कल्पना केली होती तसेच हे मैदान सुंदर आहे. त्यामुळे मी फारसा चकित झालो नाही. याशिवाय अर्जेंटिनाचे समर्थक मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित होते. सामन्याच्या वेळी समर्थकांच्या प्रचंड प्रतिसादाने हा सामना आणि हे मैदान आमच्यासाठी विशेष बनविले आहे. सामन्यातील डावपेचाबद्दल मेस्सी म्हणाला की, सामन्याच्या उत्तरार्धात आम्ही आखलेल्या रणनीतीमुळे आम्हाला मैदानात मुक्त वावर करणे शक्य झाले. आमचे बचावपटू आणि आक्रमक या दोघांनाही या रणनीतीचा फायदा झाला.
lionel-
Short URL: https://vrittabharati.in/?p=13609

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!