Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गंगेच्या किनार्‍यावर वृक्षारोपण : उमा भारती

गंगेच्या किनार्‍यावर वृक्षारोपण : उमा भारती

=नदी शुद्धीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल जारी=
UMA BHARATIनवी दिल्ली, [२२ मार्च] – गंगा नदीच्या किनार्‍यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम कालबद्धरीत्या पूर्ण केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय जलसंसाधन आणि गंगा नदी संरक्षण मंत्री उमा भारती यांनी आज मंगळवारी येथे केली.
राजधानीतील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात उमा भारती यांनी गंगा नदी वृक्षारोपणाशी संबंधित सविस्तर प्रकल्प अहवाल जारी केला. यावेळी केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर आणि जलसंसाधन, गंगा नदी संरक्षण तसेच नदी विकास राज्यमंत्री सांवरलाल जाट उपस्थित होते. गंगा नदीचे पाणी शुद्ध ठेवण्यात गंगा नदीच्या उगमापाशी असलेल्या औषधी आणि अन्य वनस्पतींचे मोठे योगदान आहे. गंगेचे पाणी या औषधी वनस्पतींना स्पर्श करून येत असल्यामुळे त्यात आपोआपच औषधीगुण आले, त्यामुळे गंगेचे पाणी नेहमीच शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे. गंगा नदीचे पाणी शुद्ध ठेवण्यात ब्रह्मद्रव्य या घटकाचे मोठे योगदान आहे आणि हे संशोधनातून सिद्ध झाले आहे, याकडे उमा भारती यांनी लक्ष वेधले.
गंगा नदी शुद्धीकरणाचा संकल्प आमच्या सरकारने सोडला आहे. उत्तराखंडपासून गंगा नदीच्या किनार्‍यावर औषधी आणि अन्य उपयुक्त वनस्पतींचे रोपण केले जाईल. याचा फायदा गंगा नदीचे पाणी शुद्ध आणि निर्मल होण्यासोबत पाण्यातील जीवजंतूचे रक्षण करण्यासाठीही होणार आहे. त्याचप्रमाणे नदीच्या किनार्‍यावर वृक्षारोपण केल्यामुळे झाडांची मूळ जमिनीत खोलवर जाऊन जमीन ढासळण्याची शक्यताही कमी होणार आहे. एकूणच या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्याबद्दल उमा भारती यांनी देहराडूनच्या वन संशोधन केंद्राचे अभिनंदन केले.
गंगा नदीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असल्याचा निर्वाळा वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिला. नदीच्या पाणलोट क्षेत्रात वनांची लागवड केली पाहिजे, यामुळे वन आणि नदीचा जिवंत संबंध येईल, याचा फायदा झाड आणि त्याच्या मूळांमुळे जमिनीचे क्षरण थांबविण्यासोबत जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठीही होईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27545

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (583 of 2453 articles)


=आज जागतिक हवामान दिन= नागपूर, [२२ मार्च] - जागतिक तापमानवाढीला वेळीच आवर घातला नाही, तर हवामानबदलाचे याहीपेक्षा भयंकर परिणाम भविष्यात ...

×