Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गतिमाननंतर भारतात धावणार आता टॅल्गो एक्सप्रेस

गतिमाननंतर भारतात धावणार आता टॅल्गो एक्सप्रेस

=ताशी २०० किमीचा वेग, जून महिन्यात चाचणी=
talgo-trainनवी दिल्ली, [१८ एप्रिल] – वेगाच्या बाबतीत गतिमान एक्सप्रेसवरही मात करणार्‍या टॅल्गो एक्सप्रेसची चाचणी भारतात लवकरच केली जाणार आहे. या गाडीची चाचणी तीन टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी केली जाणार आहे.
हजरत निझामुद्दिन ते आग्रा दरम्यान धावणार्‍या गतिमान एक्सप्रेसचा वेग ताशी १६० किमी आहे. मात्र दिल्ली ते मुंबई धावणार्‍या टॅल्गो एक्सप्रेसचा वेग ताशी २०० किमी राहणार आहे. म्हणजे गतिमान एक्सप्रेसपेक्षा याचा वेग ताशी ४० किमीने जास्त राहणार आहे.
जून महिन्यात या गाडीची चाचणी बरेली ते मुरादाबाद या दरम्यान ताशी ११५ किमीच्या वेगाने घेतली जाणार आहे. दुसरी चाचणी ताशी १८० किमीच्या वेगाने मथुरा आणि पलवल दरम्यान आणि तिसरी आणि अंतिम चाचणी दिल्ली आणि मुंबई दरम्यान जयपूर वा कोटा मार्गे केली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयातील सूत्राने सांगितले.
विशेष म्हणजे, सध्या अस्तिवात असलेल्या रेल्वेमार्गावरच या गाडीची चाचणी करण्याची तयारी स्पेनच्या कंपनीने दर्शवली आहे. या गाडीसाठी रेल्वेमार्गावर कोणतेही बदल करण्यात येणार नाही. या गाडीच्या चाचणीचा खर्चही ही कंपनीच उचलणार आहे.
टॅल्गो गाडीचे ९ डबे बार्सिलोनावरून जहाजाने भारतात पाठविण्यात आले आहे. मुंबईहून हे डबे इज्जतनगर डेपोत पाठविण्यात येतील. त्यानंतर जून महिन्यात या गाडीची चाचणी केली जाईल. या गाडीचे डबे वजनाने हल्के असल्यामुळे विजेचा खर्चही कमी येणार आहे.
गतिमान एक्सप्रेसनंतर वेगवान अशी ही दुसरी गाडी राहणार आहे. या गाडीमुळे दिल्ली आणि मुंबईदरम्यानच्या प्रवासातील वेळ आणखी कमी होणार आहे. राजधानीने लागणारा वेळ तीन तासाने कमी होणार असून, अन्य एक्सप्रेस गाड्यातील वेळ जवळपास आठ ते दहा तासाने कमी होणार असल्याचे समजते.
बुलेट ट्रेनच्या आधी टॅल्गो एक्सप्रेस भारतात धावू लागल्यानंतर रेल्वेच्या इतिहासात क्रांती होणार आहे. भारतात बुलेट ट्रेन ताशी ३०० किमीच्या वेगाने धावणार आहे. त्यादृष्टीने रेल्वेने पावले उचलली आहेत. पहिली बुलेटट्रेन अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27872

Posted by on Apr 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (475 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१८ एप्रिल] - पीएफ काढण्यावर कर लावण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मागे घेतला असला, तरी पीएफमधील संपूर्ण रक्कम काढता ...

×