Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गरिबांना योग्य दरात औषधी देण्याचा निर्धार: अहिर

गरिबांना योग्य दरात औषधी देण्याचा निर्धार: अहिर

hansraj ahirनवी दिल्ली, [८ मार्च] – देशातील गरीब लोकांना स्वस्त औषधी योग्य दरात देण्याचा सरकारचा निर्धार आहे. सरकारने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त पैशांत औषधी विकणार्‍यांवर सरकार कारवाई करीत असल्याचे रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज मंगळवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले.
विद्युत वरन महतो यांच्या प्रश्‍नावर अहिर म्हणाले की, निर्धारित दरांपेक्षा जास्त किमतीत औषध विकणार्‍यांवर कारवाई करण्याचा अधिकार केंद्र सरकारसोबत राज्य सरकारलाही आहे. अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती सरकारने निर्धारित केल्या आहेत. यात हृदयरोगाच्या ५३, मधुमेहाच्या ६, एचआयव्हीच्या २०, टीबीच्या २४, कर्करोगाच्या ४७ आणि किडनीच्या ६ औषधांचा समावेश आहे. आणखी काही गंभीर आजारांच्या औषधांच्या किमती नियंत्रित करण्याबाबत आमच्याकडे आरोग्य मंत्रालयाकडून सूचना आल्यास त्याचाही विचार केला जाईल.
जीवनरक्षक आणि गैरजीवनरक्षक अशी औषधांची वर्गवारी आम्ही सध्या केली नाही. सर्व औषध जीवनरक्षक समजून धोरण तयार केले आहे, याकडे लक्ष वेधत अहिर म्हणाले की, २०१३ मध्ये जे धोरण तयार करण्यात आले होते, त्यानुसारच औषधांच्या किमती निश्‍चित केल्या जातात. वर्ल्ड होलसेल प्राईस इंडेक्स (डब्ल्यूएचपीआय) च्या आधारावर दरवर्षी औषधांच्या किमती ठरवल्या जातात, यावर्षी मात्र डब्ल्यूएचपीआयची स्थिती समाधानकारक नसल्यामुळे औषधांच्या किमती वाढण्याची कोणतीच शक्यता नाही.
देशात औषधांची कोणतीच कमतरता नाही. भारत जगातील दोनशे देशात औषधांची निर्यात करीत असतो. जगातील मोठा औषधी उत्पादक देश म्हणून भारताकडे बघितले जाते, असे स्पष्ट करीत अहिर म्हणाले की, प्रसुतीशी संबंधित काही औषधांच्या किमती नियंत्रित करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यांनी अशा काही औषधांची नाव आम्हाला सूूचवली, तर आम्ही आरोग्य मंत्रालयाकडून तसा प्रस्ताव मागवून या औषधांची नावही नियंत्रित औषधांच्या यादीत समाविष्ट करू.
भारतातील औषधी कंपन्या जवळपास शंभर औषधांचे उत्पादन करतात. ज्या औषधांचे उत्पादन आपल्याकडे होत नाही, अशी नाव सदस्यांनी सुचवली तर या औषधांचे उत्पादनही या कंपन्यामार्फत देशातच करण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे अहिर यांनी स्पष्ट केले. अहिर यांच्यावर अनेक सदस्यांनी उपप्रश्‍नांची सरबत्ती केली, मात्र त्यांनी सर्व प्रश्‍नांची मुद्देसुद आणि समर्पक उत्तर देत सदस्यांचे समाधान केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27136

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (728 of 2453 articles)


औरंगाबाद, [८ मार्च] - राज्यात गाजलेल्या येथील मानसी देशपांडे हत्येप्रकरणी जावेद खान उर्फ टिंगर्‍याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी ...

×