Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » गहाळ कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

गहाळ कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

=इशरत जहॉं प्रकरण=
ishrat jahanनवी दिल्ली, [१४ मार्च] – इशरत जहॉं प्रकरणात गहाळ झालेल्या फाईल्सचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली.
इशरत जहॉं प्रकरणात लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंह यांनी या प्रकरणात गहाळ झालेल्या महत्त्वपूर्ण फाईल्सची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार आज अतिरिक्त गृहसचिव बी. के. प्रसाद यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. या फाईल्स कशा गहाळ झाल्या, याची चौकशी करून ही समिती आपला अहवाल राजनाथसिंह यांना सादर करेल.
२००९ मध्ये तत्कालीन गृहसचिवांनी इशरत प्रकरणाच्या संदर्भात ऍटर्नी जनरल यांना पाठविलेले दोन पत्र, तसेच दोन प्रतिज्ञापत्र नंतर गहाळ झाले होते. विशेष म्हणजे, ही प्रतिज्ञापत्रे अटर्नी जनरल यांनी पाहिली होती. नंतर मात्र ती गहाळ झाली. यातील पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरतला दहशतवादी म्हणण्यात आले होते. मात्र, दुसर्‍या प्रतिज्ञापत्रातून ती दहशतवादी असल्याचा उल्लेख वगळण्यात आला होता. प्रतिज्ञापत्रातील हा बदल कुणाच्या सांगण्यावरून झाला, याची चौकशीही समिती करणार आहे.
माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी प्रतिज्ञापत्रातील हा बदल माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य आणखी वाढले आहे. नवीन प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तत्कालीन गृहसचिवांनी आक्षेप घेतला होता का, तसेच त्यांनी आक्षेप घेतला नसेल तर कोणत्या आधारावर नव्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली, याची चौकशी ही समिती करणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27295

Posted by on Mar 14 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (668 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१४ मार्च] - गेल्या काही वर्षांपासून सर्च इंजिन याहूने आपला विस्तार कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता कंपनीने ...

×