Home » ठळक बातम्या, मराठवाडा » गारपीटग्रस्त ४ शेतकर्‍यांची आत्महत्या

गारपीटग्रस्त ४ शेतकर्‍यांची आत्महत्या

बीड, (१५ मार्च) – गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात वादळ-वार्‍यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासकीय मदतीसाठीही प्रशासनाचेही हात बांधले गेले आहे. अशा परिस्थितीत लातूर, उस्मानाबाद आणि बीड येथील गारपीटग्रस्त चार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे.
बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील मांडवा गावातील गारपीटग्रस्त शेतकरी महादेव शेळके या अवघ्या २० वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. अखेर घरात कोणी नाही, हे पाहून त्याने आत्महत्या केली. नांदेडच्या कन्नड तालुक्यातील गोळेगाव येथील शेतकरी संतुका गारोळे आणि भोकर तालुक्यातील मारुती झिल्लेवाड या २५ वर्षीय युवा शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्याआधी लातूरमधील गारपीटग्रस्त शेतकरी भागवत माने यांनीही आत्महत्या केली होती. शिरूर अनंतपाल तालुक्यातील उत्तरशेंड गावात ही घटना घडली.
उस्मानाबाद येथील अन्य एक गारपीटग्रस्त शेतकरी राजेंद्र लोमटे यांनीही स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ते ८० टक्के भाजले असून, त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेंद्रवर आधी कर्ज होते, त्यात गारपिटीमुळे अख्खे पीक वाया गेल्यामुळे त्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागली असल्याचे बोलले जाते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11947

Posted by on Mar 15 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2435 of 2454 articles)


लाहोर, (१३ मार्च) - आपल्या सशक्त अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायमच चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी आपण यापुढे पाकिस्तानविरोधातील ...

×