Home » ठळक बातम्या, विदर्भ » गावितांच्या बदल्यात गावित

गावितांच्या बदल्यात गावित

=विजयकुमारांचे भाऊ शरद गावितांना मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता=
मुंबई, (२१ मार्च) – वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढविण्याची घोषणा होताच. विजयकुमारांनी स्वत:हूनच आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादीने आपली चक्रे फिरवत विजयकुमारांचे भाऊ व समाजवादी पक्षाचे आमदार शरद गावित यांना राष्ट्रवादीमध्ये आणण्याचे प्रयत्न चालविले आहे. लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि त्यांना महसूल राज्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नंदूरबारची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात घेण्याची मागणी विजयकुमार गावितांनी शरद पवारांना बर्‍याच वेळा केली. मात्र, ती कॉंग्रेसकडेच राहिल्याने, आधीच लोकसभा लढवण्याचे मन बनवलेल्या गावितांनी पक्षनेतृत्वाचे सर्व आदेश आणि धमक्यांना न जुमानता मुलीचा भाजपा प्रवेश करून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला.
विजयकुमार गावितांना वेगवेगळ्या पद्धतीने समजावले खरे पण तेे कोणत्याही मार्गाने समजू शकले नाही. मागच्या लोकसभेतही शरद गाावित हे अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते आणि त्यांनी तब्बल २ लाख ३५ हजार मते मिळवली होती. यामागे राष्ट्रवादीच्या छुपा पाठिंबा असल्याचेही बोलले जाते. अशाच पद्धतीने हिनाने अपक्ष निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने विजयकुमारांकडे ठेवला होता. मात्र, यावेळी विजयकुमार हे मुलीच्याबाबतीत कोणतीही आपत्ती ओढवून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यामुळेच त्यांनी अखेर मंत्रिपदही कुर्बान केले आणि सेफ गेम खेळण्याची पूणर्र्तयारी केली आहे. पवारांचा ‘गेमप्लान फेल’ होताना दिसताच, त्यांनी फासे फिरवले आणि आपले लक्ष्य शरद गावितांना केले. शरद गावित हे पवारांच्या गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात असून, नुकतीच पवारांबरोबर त्यांची बोलणी झाली असून, ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
शरद गावितांना महसूल राज्य तर धसांना वैद्यकीय शिक्षण
लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असून, विजयकुमारांचे वैद्यकीय शिक्षणमंत्रिपद पराजय झाल्यास सुरेश धस यांना देण्यात येईल. तर धसांचे महसूल राज्यमंत्रिपद शरद गावितांना दिले जाईल. शिवाय धस यांच्याबाबतीतल्या शक्यतांच्या किंतुपरंतुपेक्षा शरद गावितांचे मंत्रिपद निश्‍चित असल्याचे राजकीय जाणकार सांगताहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12146

Posted by on Mar 22 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2434 of 2455 articles)


=नाणी चलनात राहणार= नवी दिल्ली, (१६ मार्च) - विवाह समारंभ किंवा धार्मिक उत्सवात आरास करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या ...

×