किमान तापमान : 27.11° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 83 %
वायू वेग : 3.21 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
26.31°C - 28.81°C
broken clouds26.38°C - 28.98°C
broken clouds26.21°C - 29.45°C
sky is clear26.14°C - 28.72°C
scattered clouds25.54°C - 28.44°C
sky is clear25.16°C - 28.57°C
sky is clearनवी दिल्ली, [१२ जून] – ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरधर गमांग यांनी आज शुक्रवारी येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आणि भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली.
भाजपाध्यक्षांनीही गमांग यांच्या पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे. तथापि, पक्षप्रवेशाची औपचारिकता लवकरच भुवनेश्वर येथे पार पाडण्यात येणार आहे. गेमांग यांनी गेल्या ३० मे रोजी कॉंगे्रसचा राजीनामा दिला होता. भाजपाची धोरणे देशहिताची असल्यानेच आपण या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती गमांग यांनी यावेळी दिली.
भावी राजकीय कारकीर्दीसाठी माझ्यापुढे अनेक पर्याय होते. पण, मी भाजपाचीच निवड केली. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि कॉंगे्रसला ठोस पर्याय देण्याची क्षमताही केवळ याच पक्षात असल्याचे आता सिद्ध झाले आहे. भारतीय लोकशाहीत या पक्षाने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर लोकसेवेसाठी राजकारण करतो, हे भाजपाचे धोरण मला फार आवडले, असेही त्यांनी स्पष्ट केले.