Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गुढीपाडव्याच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

gudhipadvaनवी दिल्ली, [२१ मार्च] – आज हिंदू नववर्षातील पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू नववर्षाआरंभी महाराष्ट्रातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरुन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ट्‌विटरवरुन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस. आज दारोदार गुढी उभारुन नवीन सुरु होणार्‍या वर्षांचे स्वागत आनंदात आणि उत्साहात केले जाते. मुंबई आणि उपनगरांमध्ये नववर्षानिमित्त शोभायात्रा उत्साहात पार पडत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या शुभेच्छांच्या ट्‌विटमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख करून ‘महाराष्ट्रातील माझ्या मित्रपरिवाराला शुभेच्छा’ असे म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवरोझ आणि उगडीच्याही शुभेच्छा दिल्या आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21647

Posted by on Mar 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1862 of 2453 articles)


मुंबई, [२० मार्च] - विधान परिषदेच्या सभापतिपदासाठीची निवडणूक टाळण्यात सत्ताधारी भाजपाला अखेर यश आले आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी बिनविरोध निवडीची परंपरा ...

×