Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गुलाम नबींचा तोल गेला; संघाची इसिसशी तुलना

गुलाम नबींचा तोल गेला; संघाची इसिसशी तुलना

=भाजपाची माफीची मागणी=
Ghulam-Nabi-Azadनवी दिल्ली, [१३ मार्च] – जमियत उलेमा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेच्या व्यासपीठावर देशद्रोहाचे आरोपी उमर खलिद आणि अनिर्बान भट्टाचार्यच्या सुटकेची मागणी केल्यानंतर जोशात आलेले कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा तोल गेला आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना चक्क इसिस या जहाल दहशतवादी संघटनेशी केली.
कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे उर्दूत स्वाक्षरी केलेले पत्र जमियतच्या बैठकीत वाचून दाखविल्यानंतर गुलाम नबींना चांगलाच जोश आला होता. याच ओघात त्यांनी, दहशतवादाच्या बाबतीत धर्म हा मुद्दा असू शकत नाही. अतिरेकी कारवाया करणारे मुस्लिम आणि रा. स्व. संघ एकच आहेत, असे ते बोलून बसले. यापूर्वी कॉंगे्रस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही कॉंगे्रसच्या एका बैठकीत संघाची तुलना दहशतवादी गटांशी केली होती.
त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने टीकेची जोरदार झोड उठविली आहे. आझाद हे कॉंगे्रसचे गुलाम असून, केंद्रीय नेत्यांच्या इशार्‍यावर ते नाचत असतात, असा आरोप भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला. देशावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आले, त्या प्रत्येक वेळी संघाने देशसेवेचे कार्य केले आहे. ही सत्यता माहीत असतानाही आझाद यांनी केलेले हे वक्तव्य कॉंग्रेसच्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारे आहे, अशी टीका विजयवर्गीय यांनी केली.
मे २०१४ मध्ये झालेला दारुण पराभव कॉंग्रेसला पचलेला नसल्याने हा पक्ष हताश झाला आहे. त्यातूनच अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचे भाजपाचे अन्य एक वरिष्ठ नेते श्रीकांत शर्मा यांनी म्हटले आहे. गुलाम नबींनी संघाची माफी मागावी, तसेच सोनिया गांधी यांनी आझादांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली
भाजपा संसदेत मुद्दा उठविणार
रा. स्व. संघाची तुलना इसिसशी करण्याच्या कॉंगे्रस नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचा मुद्दा संसदेत प्रभावीपणे उचलून धरण्याचा आणि कॉंगे्रसला अडचणीत आणण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
रा. स्व. संघ ही देशप्रेमी संघटना असून, देशाच्या कल्याणात संघाचे योगदान फार मोठे आहे. असे असतानाही आझाद यांनी संघाची तुलना कू्ररतेची सीमा ओलांडणार्‍या इसिससोबत केली. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही. आझाद यांनी जाहीरपणे माफी मागायलाच हवी, अशी भाजपाची भूमिका राहणार असल्याचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27283

Posted by on Mar 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (672 of 2453 articles)


हैदराबाद, [१३ मार्च] - सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळ काढणारे मद्यसम्राट विजय ...

×