Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » गुलाम नबींविरुद्ध डॉ स्वामींची विशेषाधिकार भंगाची नोटीस

गुलाम नबींविरुद्ध डॉ स्वामींची विशेषाधिकार भंगाची नोटीस

SUBRAMANIAN_SWAMYनवी दिल्ली, [२९ एप्रिल] – व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचा दावा करणारे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी सदस्यत्वाची शपथ घेतल्यापासून केलेल्या वक्तव्यांमुळे कॉंग्रेस सदस्यांनी राज्यसभेत प्रचंड गदारोळ केला. शुक्रवारी सकाळी कामकाजाला प्रारंभ होताच डॉ. स्वामी यांनी उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्याकडे विशेषाधिकार भंगाच्या नोटीसबाबत विचारणा करताच कॉंग्रेस सदस्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यात कुरियन यांचा बराच वेळ गेला. तुम्ही विशेषाधिकाराचे हनन झाल्याची जी नोटीस दिली आहे त्यावर अध्यक्ष हमीद अन्सारी विचार करतील आणि सकृतदर्शनी त्यात तथ्य असल्याचे निदर्शनास आल्यास ती विशेषाधिकार समितीकडे पाठविली जाईल, असे कुरियन यांनी सांगताच डॉ. स्वामी शांत झाले.
आपण गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस देणार असल्याचे डॉ. स्वामी यांनी शुक्रवारी सकाळीच ट्विट केले होते. शून्यप्रहरात सरकारी कागदपत्रे सादर झाल्यानंतर जयराम रमेश यांनी गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुद्यावर चर्चेच्या नोटीसबाबत विचारणा केली. उपाध्यक्ष कुरियन उभे असतानाही डॉ. स्वामी यांचा माईक का सुरू आहे, अशी विचारणा कॉंग्रेसच्या कुमारी शैलजा यांनी केली. परंतु, आपण त्यांना बोलण्याची परवानगी दिली असल्याने त्यांचा माईक सुरू असल्याचे कुरियन यांनी स्पष्ट केले. आपल्या विशेषाधिकार हनन नोटीसबाबत विचारणा करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असेही उपाध्यक्षांनी स्पष्ट केल्यानंतर प्रकरण शांत झाले.
२७ एप्रिल रोजी सभागृहात बोलताना गुलाम नबी आझाद यांनी संपुआ सरकारने ऑगस्टा वेस्टलॅण्डला काळ्या यादीत टाकल्याचा दावा केला होता.
कॉंग्रेसची सरकारविरोधात नोटीस
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात विशेषाधिकाराचा भंग केल्याची नोटीस दिल्यानंतर कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनी संरक्षण मंत्रालयाने संसदेचे अधिवेशन सुरू असताना ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी निवेदन जारी केल्याबद्दल सरकारविरोधात विशेषाधिकाराचा भंग केल्याची नोटीस दिली. शांताराम नाईक व हुसैन दलवाई या कॉंग्रेस सदस्यांनी ही नोटीस दिली. राज्यसभेचे अधिवेशन सुरू असताना संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करण्याची अपेक्षा होती. परंतु, सरकारी संकेतस्थळावर हे निवेदन प्रसिद्ध करून सरकारने विशेधिकाराचा भंग केला आहे, असा या सदस्यांचा आरोप आहे.
आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने राज्यसभेत शुक्रवारी शांतता होती आणि दुपारनंतर गणपूर्तीअभावी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28100

Posted by on Apr 30 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (404 of 2453 articles)


हायकोर्टाचे आदेश आव्हानासाठी १२ आठवड्यांची मुदत • दोषी अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचे निर्देश मुंबई, [२९ एप्रिल] - कारगिल शहीदांच्या परिवारासाठी बांधण्यात ...

×