गॅमलीन यांनी पदभार स्वीकारला
Sunday, May 17th, 2015=केजरीवाल-जंग यांच्यात संघर्षाचा भडका=
नवी दिल्ली, [१६ मे] – दिल्ली सरकारचा विरोध झुगारून शकुंतला गॅमलीन यांनी आज शनिवारी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात संघर्षाचा भडका उडाला असून, केजरीवाल यांनी हे प्रकरण थेट राष्ट्रपतींच्या दरबारी नेण्याचे ठरविले आहे.
नायब राज्यपालांनी गॅमलीन यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तथापि, केजरीवाल यांनी त्यास विरोध दर्शविला होता. सरकारमधील वरिष्ठ अधिकार्याने गॅमलीन यांना पत्र पाठवून, त्यांची नियुक्ती कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचेही स्पष्ट केले होते.
गॅमलिन यांनी मात्र सरकारचा विरोध झुगारून आज शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर संतप्त झालेल्या केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आणि हे प्रकरण आपण आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे नेणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी राष्ट्रपतींकडे भेटीची वेळही मागितली आहे. नायब राज्यपालांच्या माध्यमातून आपल्या सरकारविरोधात भाजपाने केलेला हा राजकीय उठावच असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीचे मुख्य सचिव के. के. शर्मा खाजगी कामानिमित्त अमेरिकेला गेले असल्याने या पदाची अतिरिक्त जबाबदारी नायब राज्यपालांनी गॅमलीन यांच्यावर सोपविली होती. तथापि, जनतेने निवडून दिलेल्या सरकारला डावलून राज्यपाल अशी कोणतीही नियुक्ती करू शकत नाही व ही नियुक्ती घटनाबाह्य आहे, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे, नायब राज्यपाल हे केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीचे प्रतिनिधी आहेत आणि गॅमलीन यांची नियुक्ती घटनेच्या कलम २३९ एए नुसार करण्यात आली आहे, अशी भूमिका जंग यांनी घेतली.
दरम्यान, आम आदमी पार्टीला दिल्लीकरांनी अभूतपूर्व मताधिक्याने सत्ता दिली असतानाही केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने नायब राज्यपालांच्या माध्यमातून आप सरकारविरोधात राजकीय उठाव केला आहे. सरकार अस्थिर करण्याचा हा कटच आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22573

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!