Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » गैरहजर खासदारांची पंतप्रधानांकडून कानउघाडणी

गैरहजर खासदारांची पंतप्रधानांकडून कानउघाडणी

=भर बैठकीत केले उभे=
नवी दिल्ली, [१७ मार्च] – भूमी अधिग्रहण विधेयकावर लोकसभेत मतदान होणार असल्याने सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करूनही ऐन मतदानाच्या दिवशी सभागृहात अनुपस्थित राहिलेल्या भाजपाच्या २० खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रखर रोषाचा सामना करावा लागला.
भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी मतदानाच्या दिवशी सभागृहात अनुपस्थित राहिलेल्या खासदारांची नावे वाचून दाखविली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या खासदारांना खडसावले आणि भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशी ताकीद दिली. भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांच्या पूर्णपणे हिताचे असतानाही जर खासदारांना सरकारचे विधेयक निरुपयोगी वाटत असेल, तर त्यांनी निवडणुकीची तिकिटे घेऊन पहिल्या क्रमांकाने निवडणूक का जिंकली, अशा शब्दात नायडू यांनीही या खासदारांना फटकारले.
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने भूमी अधिग्रहण विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकावर मतदानाची प्रक्रियाही पार पाडली. पक्षाने व्हीप जारी केला असतानाही २० खासदार गैरहजर असल्याचे दिसून आले. या खासदारांना संसदीय मंडळाच्या आठवडी बैठकीत उभे करण्यात आले. यात वरुण गांधी, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, बाबुल सुप्रियो यांचा प्रामुख्याने समावेश होता. पक्षाच्या बैठकीत त्या सर्व खासदारांचे नाव घेऊन त्यांना उभे करण्यात आले. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी दहा मिनिटे आधी पोहोचले. ठरलेल्या वेळेनंतर बैठकीला आलेल्या खासदारांनाही यावेळी जाब विचारण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21547

Posted by on Mar 18 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1885 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१७ मार्च] - जाट समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी इतर मागास वर्गीयांमध्ये जाट ...

×