Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » गोंधळ बरा नव्हे!

गोंधळ बरा नव्हे!

=राष्ट्रपतींच्या विरोधकांना कानपिचक्या=
pranab-mukherjee_290नवी दिल्ली, [१९ जानेवारी] – संसदेत विरोधकांच्या गोंधळात स्पष्ट बहुमताचा आवाज दबून जायला नको, असे स्पष्ट मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी व्यक्त केले. सोबतच, सर्वसामान्य विधेयकांकरिता सरकारने वटहुकूम आणण्याचा मार्ग अवलंबू नये, असा सल्लाही राष्ट्रपतींनी दिला.
असाधारण स्थितीत असाधारण उद्देश साध्य करण्यासाठीच अध्यादेशाचा मार्ग स्वीकारला जावा हाच वटहुकूमचा पर्याय ठेवण्यामागचा मूळ उद्देश आहे, असे राष्ट्रपतींनी राज्यघटनेचा हवाला देत स्पष्ट केले. एखाद्या सभागृहात आपल्याला बहुमत नाही, म्हणून अध्यादेशाचा मार्ग अवलंबणे योग्य नाही. मी १९५२ पासूनचे प्रत्येक अधिवेशन पाहिले आहे. आतापर्यंत केवळ चारच कायदे संयुक्त अधिवेशनात तयार करण्यात आले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय विश्‍वविद्यालय आणि संशोधन संस्थांच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.
वटहुकूम जारी करण्याची स्थिती टाळण्यासाठी सरकार आणि विरोधक दोघांनीही एकत्र बसून व्यावहारिक तोडगा काढण्याची गरज आहे. कधीकधी विरोधक गोंधळ घालून सरकारचा बहुमताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातूनही सरकारला वटहुकूम काढण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. पण, तसे न करता सरकार व विरोधकांनी एकत्र यायलाच हवे. योग्य तोडगा काढण्याची जबाबदारी दोघांचीही असते. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आपल्याकडे बहुमत आहे आणि सरकार अल्पमतात आहे म्हणून विरोधकांनी नावापुरता विरोध करून आणि गोंधळ घालून सभागृहाला वेठीस धरायला नको. लोकसभा असो वा राज्यसभा संयुक्तपणे देशापुढील समस्या सोडविण्यावर भर द्यायला हवा, असे राष्ट्रपती म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19828

Posted by on Jan 20 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2207 of 2453 articles)


=अमित शाह यांनी केली घोषणा= नवी दिल्ली, [१९ जानेवारी] - दिल्ली विधानसभेची निवडणूक भारतातील पहिल्या महिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी ...

×