Home » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » गोध्राचा प्रमुख आरोपी फारुखला १४ वर्षांनी अटक

गोध्राचा प्रमुख आरोपी फारुखला १४ वर्षांनी अटक

godhra_trainअहमदाबाद, [१८ मे] – गुजरातच्या गोध्रा जिल्ह्यात २००२ मध्ये ट्रेनला आग लावून ५९ कारसेवकांचे बळी घेणारा या जळीत कांडातील मुख्य सूत्रधार फारुख मोहम्मद भाना याला तब्बल १४ वर्षांनंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत.
या गोध्रा जळीत कांडानंतर गुजरातमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता. २७ फेबु्रवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्सप्रेस आली असताना, या गाडीचा एस-६ क्रमांकाचा डबा बाहेरून बंद करून आग लावण्यात आली होती. या भीषण कटाचा सूत्रधार फारुख भाना होता. गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अमन अतिथीगृहात एका बैठकीत या भीषण घटनेची योजना तयार झाली होती, असा दावा एटीएसने केला आहे. गोध्रा कांडानंतर गेल्या १४ वर्षांपासून तो भूमिगत होता.
एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मते, गोध्रा कांड घडले, तेव्हा भाना हा गोध्राचा नगरसेवक होता. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी तो मुंबईला आला होता आणि ओळख बदलवून प्रॉपर्टी व्यवसाय करू लागला. आज तो मुंबईवरून गोध्राकडे जात होता.
त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर पाळत ठेवली आणि पंचमहल जिल्ह्यातील कालोलच्या टोल नाक्यावर त्याला अटक केली, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28321

Posted by on May 18 2016. Filed under गुजरात, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गुजरात, ठळक बातम्या, राज्य (320 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१८ मे] - पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवारी ...

×