Home » ठळक बातम्या, मराठवाडा » गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती=
Gopinath Mundeपरळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे.
के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ परळी तालुक्यातील पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर परिसरात आहे. याचठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात ३०बाय ५० फुटांचे आणि ४०० बाय ५०० फूट आकाराचे मंडप उभारण्यात आले आहेत.
कार्यक्रमाला राज्यभरातील कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याने परळी – बीड मार्गावरील पांगरी येथून जाणार्‍या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. दसर्‍याला भगवानगड, तर बारा डिसेंबरला गोपीनाथगडावर दरवर्षी भगवानबाबांचे भक्त व गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांचा मेळावा होणार असल्याने गोपीनाथगडाला विशेष महत्व येणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी सायंकाळी समाधिस्थळी पाहणी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18978

Posted by on Dec 12 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2320 of 2454 articles)


=जम्मू-काश्मीर ५९ टक्के, झारखंड ६१ टक्के= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] - विधानसभा निवडणुकीचे पहिले दोन्ही टप्पे शांततेत आणि विक्रमी मतदानाने ...

×