Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » गोमूत्, शेणाच्या होळीने साधू सांगणार गाईचे महत्त्व

गोमूत्, शेणाच्या होळीने साधू सांगणार गाईचे महत्त्व

HOLiइंदूर, [२२ मार्च] – भारतीय संस्कृतीतील गाईचे महत्त्व विशद करण्यासाठी देशातील १३ आखाड्यांच्या साधूंनी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे एकत्र येत, गोमूत्र आणि शेणाने होळी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख नरेंद्र गिरी यांनी ही परंपरा फार जुनी असल्याचे सांगितले आहे. तसेच रासायनिक रंग त्वचेसाठी हानीकारक असतात, त्यामुळे त्याऐवजी आम्ही गायीच्या शुद्ध शेणाचा वापर करतो, असे परिषदेचे सदस्य दिग्विजय दास यांनी सांगितले.
देशातील शैव, वैष्णव व उदासिन अशा विविध पंथ व संप्रदायांचे प्रतिनिधीत्त्व करणारे १३ प्रमुख आखाडे सिंहस्थाला आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेऊन होळी साजरी करतात. दर १२ वर्षांनी येणार्‍या सिंहस्थात हा सोहळा रंगतो. उद्या अर्थात बुधवारी होलिकोत्सवानिमित्त या सर्व १३ आखाड्यांचे साधू एकत्र येऊन गोमूत्र व शेणाची होळी खेळतील. सकाळी न्याहरी करून व थंडाई पिऊन हा उत्सव सुरू होईल. वृद्ध साधूंच्या कपाळाला शेणाचा टिळा लावून शुभेच्छा दिल्या जातील. सायंकाळी सर्व साधू एकमेकांवर फुले आणि चंदन पावडरचा वर्षाव करतील, अशी माहिती आखाडा परिषदेने दिली आहे. त्याचबरोबर परिषदेचे सरचिटणीस हरी गिरी यांनी गाईच्या शेणामुळे सर्व प्रकारचे त्वचारोग बरे होतात, त्यामुळे गायीच्या शेणाचे फायदे समजावण्यासाठीही हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27532

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (587 of 2453 articles)


कराची, [२२ मार्च] - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष करण्यासाठी विषारी दारू पिल्याने २४ हिंदूंचा मृत्यू झाला. यात सहा ...

×