Home » क्रीडा, ठळक बातम्या » गोल करणे स्वप्नवत वाटते : गोत्झे

गोल करणे स्वप्नवत वाटते : गोत्झे

रियो दी जानेरियो, [१४ जुलै] – विश्‍व करंडकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, त्यातही गोल करण्यात यश मिळेल या दोन्ही घटना मला अजूनही स्वप्नातीलच वाटत आहेत असे मनोगत जर्मनी संघाला विश्‍व करंडक मिळवून देण्यात निर्णायक गोल करणारा बदली खेळाडू गोत्झे याने व्यक्त केले. गत अनेक महिने माझ्यासाठी संघर्षाचे ठरले.
मॅराकाना स्टेडियममध्ये दिग्गज गणला जाणार्‍या क्लोसे याच्या जागेवर बदली खेळाडूच्या रुपात गोत्झे याला खेळातील ८७ व्या मिनिटाला उतरविण्यात आले होते. त्यावेळी त्याला आपणच हिरो ठरणार याची साधी कल्पनाही आली नसावी. तो छान खेळला. शेवटी ११३ व्या मिनिटाला मिळालेल्या पासवर त्याने चेंडू छातीवर थोपविला, तो चेंडू जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच गोत्झेने मारलेली किक सरळ गोलमध्ये परिवर्तीत झाली. हिच किक निर्णायक ठरली. जर्मनी विश्‍व करंडकाचा मानकरी ठरला. माझ्या गोलने विश्‍व करंडक, विश्‍वासच बसत नाही असे तो वारंवार म्हणत होता. शेवटी निर्णायक गोल जर्मनीसाठी आणि फुटबॉल संघासाठी पार्टी करण्याची ठरली आहे. गोत्झे हा ब्रायर्न म्युनिचचा खेळाडूही आहे. त्याला तर पहिल्या अकरा खेळाडूत स्थानही मिळत नव्हते हे येथे उल्लेखनीय.
गत एक वर्ष माझ्यासाठी फारच संघर्षांचेच ठरले होते. ब्राझीलसारख्या देशात माझ्या गोलवर जर्मनीने विश्‍व विजेते व्हावे, ही घटना माझ्या कुटुम्बातील प्रत्येक सदस्यांसाठी आणि माझी मैत्रीण (मॉडेल कॅथरीन ब्रोमेल) यांच्यासाठी आनंदाची आहे. त्यांचेच सहकार्य मला मिळत असे. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभार मानतो. त्यांनीच माझयावर जो विश्‍वास टाकला होता तो सार्थकी ठरविला गेला ही जिवनातील संस्मरणिय घटना ठरली आहे. आता मी फारच आनंदी आहे असेही गोत्झे एका उत्तरात म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14152

Posted by on Jul 14 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2397 of 2455 articles)


बर्लिन, [१४ जुलै] - गोत्झे याने खेळातील ११३ व्या मिनिटाला गोल करताच आणि विश्‍व करंडकाच्या अंतिम सामन्यात प्रथमच दक्षिण अमेरिकेच्या ...

×