Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » गोवंश हत्याबंदीचा निर्णय योग्यच: मुख्यमंत्री

गोवंश हत्याबंदीचा निर्णय योग्यच: मुख्यमंत्री

devendra-fadnavis9मुंबई, [११ मार्च] – गोवंश हत्याबंदी करणे ही राज्यसरकारांची संविधानिक जबाबदारी असून, गोवंश हत्याबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
विधान भवनाच्या पत्रकार कक्षात आयोजित वार्तालापादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर मत व्यक्त केले. राज्यात दुष्काळ असताना गोवंश हत्याबंदी लागू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का याबाबतचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता. त्यावर फडणवीस बोलत होते. दुष्काळ आहे म्हणून जनावरे विकण्याची शेतकर्‍यांना परवानगी देणे हे राज्यासाठी योग्य ठरणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपाचे आमदार भीमराव धोंडे यांनी दुष्काळात भाकड जनावरे पोसणे शेतकर्‍यांना परवडत नाही. याबाबतचे वक्तव्य केले होते. मात्र, माझ्या बोलण्याचा चुकीचा अन्वयार्थ काढण्यात आल्याचे धोंडे यांनी मला भेटून स्पष्ट केल्याचे फडणवीस म्हणाले.
शेतकर्‍याला दुष्काळ आहे म्हणून जनावरे कसायाला विकावी असे कधीच वाटत नाही. तो जनावरांवर मुलाबाळांप्रमाणे प्रेम करत असतो. त्यामुळे दुष्काळ आहे म्हणून शेतकर्‍याला जनावरे सांभाळणे जड जात आहे, असे म्हणणारे शेतकरी नसतात, ते शेतीबाह्य क्षेत्रातील घटक अशी भूमिका मांडत असतात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
इशरत जहॉंच्या नावाची रुग्णवाहिका त्वरीत बंद करणार
लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेची सदस्या असलेली इशरत जहॉं ही आतंकवादी होती, हे डेव्हीड हेडलीच्या जबाबातून स्पष्ट झाले तसेच त्या आधीच्या पुराव्यातूनही हे सिद्ध झाले होते. त्यामुळे जर इशरत जहॉंच्या नावाने रुग्णवाहिका चालविल्या जात असतील तर त्या त्वरित बंद केल्या जातील.
अशा प्रकारे इशरत जहॉंच्या नावाने रुग्णवाहिका चालवून मतांसाठी लांगूनचालन करताना दहशतवादाचे उद्दात्तीकरण करणार्‍यांनी याबाबत आता तरी आत्मपरिक्षण करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. जीतेंद्र आव्हाड व वसंत डावखरेंनी इशरतचे उदात्तीकरण केल्याची जी तक्रार भाजपा आमदारांनी केली त्याची योग्य चौकशीही होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परप्रांंतीयांच्या रिक्षा जाळण्याच्या आदेशासंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही लोक राजकारणात आपली जागा शोधण्यासाठी अशी विधाने करत असतात. त्यांच्या विधानांकडे माध्यमांनी विशेष लक्ष देण्याची गरज नाही. या राज्यात १५ वर्षांहून अधिक वास्तव्य असणारा कोणत्याही प्रांतातील नागरिक येथे रिक्षाच्या परमीटसाठी अर्ज करू शकतो. मात्र त्यांना स्थानिक प्रादेशिक भाषा येणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27248

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (685 of 2451 articles)


=आरबीआयने दिले चौकशीचे आदेश= मुंबई, [११ मार्च] - शेतकरी आणि कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात आले असल्याचा ...

×