Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » गोविंदराव पानसरे अनंतात विलीन

गोविंदराव पानसरे अनंतात विलीन

=हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार=
govind_pansareकोल्हापूर, [२१ फेब्रुवारी] – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, डाव्या चळवळीचे अध्वर्यू गोविंदराव पानसरे यांना शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी येथील पंचगंगेच्या काठावर अखेरचा निरोप देण्यात आला. कामगार, श्रमिक, शेतकरी, कामकरी तसेच शोषितांसाठी लढा देणारे झुंझार व्यक्तिमत्त्व आज लोप पावले. हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लढवय्या नेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
कोल्हापूरमधल्या पंचगंगा घाटावर गोविंदराव पानसरे यांना अखेरचा लाल सलाम देण्यात आला. त्यांना निरोप देण्यासाठी, हजारो कार्यकर्ते पंचगंगा घाटावर उपस्थित झाले होते. कुठल्याही कर्मकांडाविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा सकाळी फिरून येत असताना त्यांच्यावर अज्ञात इसमांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. पानसरे दाम्पत्याला तातडीने कोल्हापूरमधील एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. चार दिवस गोविंदराव पानसरे यांच्यावर उपचार सुरू होते. तर उमा पानसरे यांना गोळी चाटून गेल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, गोविंदराव यांना दोन गोळ्या लागल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर पण गंभीर होती. त्यामुळे त्यांना शुक्रवारी पुढील उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, २० फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकराला त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
आज सकाळी शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडल्यानंतर पानसरे यांचे पार्थिव विशेष विमानाने कोल्हापूरला नेण्यात आले. आपल्या या लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले होते. कोल्हापुरात पार्थिव दाखल झाल्यानंतर दोन तास दसरा चौकात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पंचगंगा घाटापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक सहभागी झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20820

Posted by on Feb 22 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2025 of 2451 articles)


नवी दिल्ली, [२१ फेब्रुवारी] - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिसने पुढील आर्थिक वर्षात ३० हजार लोकांना रोजगार देण्याची ...

×