Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

=रावसाहेब दानवे यांच्याकडून जनतेचे आभार=
BJP-FLAG-RALLY-IN-UP-1मुंबई, [१९ एप्रिल] – राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे पाचशे ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बहुमत मिळविल्याने पक्षाला प्रथम क्रमांक मिळाला असून, या जनादेशाबद्दल प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यांमध्ये १३४६ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाले. उपलब्ध माहितीनुसार त्यापैकी सुमारे पाचशे ग्रामपंचायतींमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बहुमत मिळवले आहे. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून राज्यात पहिला क्रमांक टिकविला आहे. पालघर जिल्ह्यात ३१५ पैकी १८७ ग्रामपंचायती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात १२४ पैकी ७८ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सरशी झाली आहे. धुळे जिल्ह्यात २९, तर यवतमाळ जिल्ह्यात २८ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने बहुमत मिळविले आहे. आदिवासीबहुल नंदूरबार जिल्ह्यात ५६ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आहे. याखेरीज इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यश मिळविले आहे. त्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
सोमवारी निकाल जाहीर झालेल्या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा व माळशिरस नगरपंचायतींमध्ये बहुमत मिळविले. तसेच कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद महापालिकांच्या पोटनिवडणुकांमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
राज्यामध्ये ऑक्टोबर २०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी घोडदौड सुरूच आहे. जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळविली.
नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या राज्यातील ५९ नगरपंचायतींच्या निवडणुकीत एकूण १००९ जागांपैकी सर्वाधिक २५४ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यावेळी कॉंग्रेस (२३३ जागा), राष्ट्रवादी कॉंग्रेस (१९६), शिवसेना (१२३) व मनसे (२) अशा इतर पक्षांच्या जागा होत्या. कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, कोल्हापूर व नवी मुंबई या महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या होत्या. राज्यात सोमवारी जाहीर झालेल्या नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांमुळे राज्यातील भाजपाची विजयी घोडदौड कायम राहिली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27920

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (459 of 2451 articles)


=प्रकाश येन्डे यांची मागणी, संसदेसमोर आंदोलनाचा इशारा= नवी दिल्ली, [१९ एप्रिल] - ईपीएस-९५ च्या लाभार्थ्यांना ७५०० रुपये निवृत्तीवेतन आणि त्यावर ...

×