Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ग्रामीण एलपीजी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

ग्रामीण एलपीजी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

=आठ हजार कोटींचा खर्च=
gas_cylinderनवी दिल्ली, [१० मार्च] – ग्रामीण कुटुंबातील महिला सदस्याला मोफत घरगुती गॅसचे (एजपीजी) कनेक्शन देण्याची तरतूद असलेल्या सुमारे आठ हजार कोटींच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गुरुवारी मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आठ हजार कोटींच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेला मान्यता देण्यात आली, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
बीपीएलच्या खाली राहणार्‍या कुटुंबातील महिला सदस्याला मोफत एलपीजी कनेक्शन देणे हा योजनेचा मुख्य हेतू असून, युद्धस्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या पुढील आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या आपल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील गरिबांना घरगुती गॅसची सुविधा नसल्याचे जेटली यांनी म्हटले होते.
‘भारतातील महिलांना स्वयंपाक करताना मोठ्या प्रमाणात धुराचा सामना करावा लागतो. स्वयंपाकघरात खुलेपणाने आग लावणे म्हणजे एका तासात ४०० सिगारेट ओढण्यासारखे आहे, असा तज्ज्ञांचा दावा आहे. आता ही परिस्थिती सुधारण्याची वेळ येऊन ठेपली आहे’, असे जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते.
यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली असून, गरीब कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे एलपीजीचे कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी प्रारंभी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात गरिबी रेषेच्या खाली असलेल्या दीड कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचे जेटली म्हणाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27210

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (703 of 2453 articles)


मुंबई, [१० मार्च] - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची ४ दिवस उलट तपासणी होणार आहे. ...

×