Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ग्रीसच्या नव्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाठिंबा

ग्रीसच्या नव्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाठिंबा

Greece-Bankruptcyब्रसेल्स, [११ जुलै] – युरोपीय आयोग, युरोपियन केंद्रीय बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ग्रीसने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सादर केलेल्या नव्या प्रस्तावाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
ग्रीसकडून ‘बेलआऊट लोन’साठी आलेला प्रस्ताव चर्चेसाठीचा आधार ठरू शकतो, असे या तिन्ही संस्थांनी युरोझोन देशातील सरकारांना सांगितले आहे.
युरोपीय संघाच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही संस्थांनी ग्रीसतर्फे सादर केलेल्या सुधारणांच्या प्रस्तावावर झालेल्या संयुक्त चर्चेनंतर त्याचे मूल्यांकन जाहीर केले आहे. हे मूल्यांकन युरोसंघाच्या अध्यक्षांना सादर करण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या महाबैठकीत युरोपियन संघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युरोपियन केंद्रीय बँकेच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. ग्रीसने आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी सादर केलेल्या ‘बेल आऊट लोन’ प्रस्तावावर चर्चा झाली. या सकारात्मक मूल्यांकनामुळे ग्रीसला कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23388

Posted by on Jul 12 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1567 of 2458 articles)


पुणे, [११ जुलै] - शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांची राज्यातील कारभाराबाबतची वक्तव्ये पाहिली तर राज्यातील सत्तेतील सहकार्‍यांचे भाजपासोबत सख्य असल्याचे दिसत ...

×