Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ग्रीसने मागितले २२१ लाख कोटींचे नवे कर्ज

ग्रीसने मागितले २२१ लाख कोटींचे नवे कर्ज

Greece-Bankruptcyब्रसेल्स, [१ जुलै] – गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसने देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे २.२१ लाख कोटी रुपयांचे नवे कर्ज मागितले आहे.
ग्रीसला नाणेनिधीचे १.५ अब्ज युरो इतके कर्ज फेडायचे आहे. या कर्जाच्या परतफेडीची मुदत मंगळवारीच संपली होती. यामुळे नाणेनिधीच्या कर्जबुडव्यांच्या यादीत विकसित असलेला ग्रीस हा पहिलाच देश ठरला आहे. युरोपियन समुहातील देशांसोबत तडजोड करण्यावर ग्रीसने भर दिला आहे.
या देशाने नव्या कर्जाची मागणी करताना देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दोन वर्षांचा आराखडाही तयार केला आहे. ग्रीसचा गेल्या पाच वर्षांतील हा तिसरा आराखडा आहे. रविवार, ५ जुलै रोजी ग्रीसने देशातील स्थितीवर सार्वमत घेण्याचेही जाहीर केले होते. पण, आता ही योजना मागे घेण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23213

Posted by on Jul 2 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1589 of 2458 articles)


महाराष्ट्राचा ब्लॅकस्टोन उद्योगसमूहाशी सामंजस्य करार साडेचार हजार कोटींची गुंतवणूक देशभरात आजपासून ‘डिजिटल इंडिया वीक’ मुंबई, [३० जून] - महाराष्ट्र ...

×