Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत घटकांची ओळख निश्‍चित

ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत घटकांची ओळख निश्‍चित

=आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची कामगिरी=
global-warming1लंडन, [१७ ऑक्टोबर] – येणार्‍या काळात अतिशय भीषण अशा नैसर्गिक संकटांसाठी कारणीभूत ठरू शकणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असलेल्या एकूण ४१ घटकांची ओळख वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने पटविली आहे. हे घटक आधी प्रादेशिक वातावरणावर प्रभाव पाडतात. त्यानंतर ते ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ठरतात, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
वातावरणातील बदलावरील पाचव्या आंतर-शासकीय पॅनेलने अलीकडेच आपला अहवाल सादर केला आहे. याच अहवालाचा आधार घेऊन वैज्ञानिकांनी या घटकांचे विश्‍लेषण केले आहे. समूद्र, समुद्रातील बर्फ, धृवप्रदेशातील कायम गोरठलेली जमीन आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीला प्रभावित करण्यासाठी ४१ प्रादेशिक घटकच प्रामुख्याने जबाबदार असल्याचे या विश्‍लेषणात दिसून आले आहे. यातील काही घटकांचा ग्लोबल वॉर्मिंगवर दोन अंशांपेक्षाही कमी प्रभाव पडतो, असे या पथकातील सदस्य आणि प्रख्यात लेखक सिब्रेन द्रिजफॉट यांचे मत आहे. साऊथॅम्पटन विद्यापीठातील समूद्र आणि भूविज्ञान विभागाचे ते प्राध्यापक आहेत.
आम्ही निर्धारित केलेल्या ४१ घटकांपैकी बहुतांश घटकांचा ग्लोबल वॉर्मिंगवर होणारा प्रभाव कमी असल्याने नेमके कोणते घटक यासाठी जास्त प्रभावी आहेत, हे अचूक ओळखणे सध्यातरी कठीण आहे. पण, हे सर्वच घटक कमी-जास्त प्रमाणात का होईना, प्रभाव पाडत असतात. तथापि, कोणता घटक, केव्हा आणि कुठे परिणामकारक सिद्ध होईल, हेदेखील या टप्प्यात निश्‍चितपणे सांगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या आम्ही समूद्र आणि त्यातील बर्फ, तसेच भाजीपाला व सागरी उत्पादनांवर कोणत्या घटकांमुळे प्रभाव पडत असतो, याचा शोध घेतला आहे. वातावरणातील बदलाचा थेट परिणाम समुद्रातील स्थितीवर होत असतो. काही देशांमधील मॉडेल्सचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असेही दिसून आले की, ऍमेझॉनचे जंगल, टुंड्रा प्रदेश आणि तिबेटियन पठारांवरील बर्फ, यासारख्या पृथ्वीवरील घटकांमध्येही काही घटकांचा परिणाम होत असतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25181

Posted by on Oct 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1326 of 2458 articles)


कृषिपंपांच्या वीजबिलांमध्ये ३३.५ टक्के सवलत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ कापूस, सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्देश ...

×