Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » घटना बदललात तर रक्तपात

घटना बदललात तर रक्तपात

=मल्लिकार्जुन खरगेंचे चिथावणीखोर वक्तव्य=
Mallikarjun Kharge1नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राज्य घटना बदलण्याचा प्रयत्न केला, तर देशात रक्तपात होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य लोकसभेतील कॉंगे्रसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी सभागृहात केले. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती समता व न्यायदिन म्हणून साजरी करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस या मुद्यावर विशेष चर्चेसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर कॉंगे्रसच्या वतीने लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना मल्लिकार्जुन खरगे बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सुरुवातीला आपल्या भाषणात घटनेतील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या दोन शब्दांवर चर्चा करण्याचे आवाहन केल्यानंतर खरगे यांनी अक्षरश: आक्रमक भूमिका स्वीकारली. केंद्रातील मोदी सरकारने घटनेत बदल करण्याचा कुठलाही प्रयत्न केला, तर देशात रक्तपात झाल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली. तथापि, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी खरगे यांनी उच्चारलेला ‘रक्तपात’ हा शब्द सभागृहातील कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, १९५० मध्ये राज्यघटना तयार झाल्यानंतर आतापयर्र्त कॉंगे्रसच्याच सत्ताकाळात शंभरपेक्षा जास्त वेळा त्यात संशोधन करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25774

Posted by on Nov 27 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1139 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] - आज भारतीय संविधान दिन आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरूवारी टि्‌वटरवरून भारतीय राज्यघटनेचे ...

×