Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ‘घर वापसी’ हा सामाजिक मुद्दा

‘घर वापसी’ हा सामाजिक मुद्दा

  • मोदी सरकारचा संबंध नाही
  • खा. योगी आदित्यनाथ यांची माहिती

yogi adityanath 3बलिया, [२८ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘घर वापसी’ मोहिमेचे समर्थन करताना, ही मोहीम पूर्णपणे सामाजिक असून, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.
सामाजिक मुद्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न व्हायला नको. बळजबरी धर्मांतरणावर बंदी घालण्यासाठी भाजपा सरकारने कायदा तयार करण्याच्या दिशेने पुढाकार घेतला आहे. ज्या हिंदू लोकांना बळजबरीने ख्रिश्‍चन व मुस्लिम केले जात आहे, त्याबाबत कोणताही राजकीय पक्ष ब्रदेखील काढत नाही. पण, आम्ही जर मूळचेच हिंदू असलेल्यांना हिंदू धर्मात आणण्याचा प्रयत्न केला, तर हेच राजकीय पक्ष आरडाओरड करीत असतात. या पक्षांनी आधी बळजबरीचे धर्मांतर रोखणार्‍या सरकारच्या पुढाकाराला पाठिंबा द्यावा, असे आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अनेक राज्यांमध्ये हिंदूंना बळजबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात आहे. गेल्याच आठवड्यात ओडिशातही हा प्रकार घडला. त्यावेळी धर्मनिरपेक्षतेचा आव आणणारे हे राजकीय पक्ष आवाज का उठवत नाहीत, असा सवाल गोरखपूरचे खासदार असलेले आदित्यनाथ यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19342

Posted by on Dec 29 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2299 of 2452 articles)


=२१ वे शतक ज्ञानाचे : पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन= वाराणसी, [२५ डिसेंबर] - सध्या सुरू असलेले २१ वे शतक हे ...

×