Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » घाऊक महागाई ऐतिहासिक नीचाकांवर

घाऊक महागाई ऐतिहासिक नीचाकांवर

=दर उणे ४.९५ टक्के, इंधन, भाजीपाला स्वस्त, कांदा मात्र महागच=
FOOD GRAIN price hike1नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] – कांदा अजूनही गृहिणींना रडवत असला, तरी इंधन आणि भाजीपाला स्वस्त झाल्याने घाऊक महागाईने आजवरचा ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाईचा दर उणे ४.९५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामुळे प्रमुख कर्जांवरील व्याजदरात कपात करण्यासाठी आरबीआयवरील दबाव आणखी वाढणार आहे.
घाऊक महागाईच्या दरात घसरण होण्याची आणि हा दर सातत्याने उणे राहाण्याची ही सलग दहावी वेळ आहे. जुलै महिन्यात हा दर उणे ४.०५ टक्क्यांवर होता. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात तो ३.८५ टक्के असा होता.
अन्नधान्य, भाजीपाला आणि इंधनाच्या किमतीत सातत्याने घट होत असली, तरी कांदा आणि डाळींच्या किमती मात्र अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. ऑगस्टमध्ये कांद्याच्या किमतीत ६५.२९ टक्क्यांनी आणि डाळीच्या किमतीत ३६.४० टक्क्यांनी वाढ झाली, असे सरकारने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
अन्नधान्याच्या किमतीत याच काळात उणे १.१३ टक्क्यांनी, भाजीपाल्याच्या किमतीत उणे २१.२१ टक्के आणि बटाट्याच्या किमतीत उणे १.९२ टक्के घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे, इंधनाच्या किमतीत उणे १६.५० टक्के घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकाचा दर गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून उण्यावरच कायम आहे. त्याआधी मे महिन्यात तो ६.१८ टक्के इतका होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23791

Posted by on Sep 14 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1478 of 2453 articles)


शंभरावर जखमी अनेक इमारतींना तडे मध्यप्रदेशच्या झाबुआतील घटना मृतांच्या निकटवर्तीयांना दोन लाखांची मदत राज्य सरकारचे चौकशीचे आदेश झाबुआ, [१२ ...

×