Home » क्रीडा, ठळक बातम्या » घानाला बलाढ्य जर्मनीने २-२ ने रोखले

घानाला बलाढ्य जर्मनीने २-२ ने रोखले

=नायजेरिया विजयी, रोनाल्डो व क्लोसे यांचे प्रत्येकी १५ गोल=
फोर्टालेझा, [२२ जून] – ब्राझील सुरू असलेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य जर्मनी संघाला घाना संघाने २-२ गोलने बरोबरीत रोखले. तर अन्य सामन्यात नायजेरिया संघाने बोस्निया हर्झेगोव्हिना संघाचा एकमेव निर्णायक गोलने पराभव केला. या सामन्यात जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोसे याने गोल करताच विश्‍व स्पर्धेत सर्वाधिक १५ गोल नोंदविलेल्या ब्राझीलच्या रोनाल्डोची बरोबरी केली. या लढतींपूर्वी झालेल्या एका महत्वाच्या सामन्यात अर्जेटिनाने इराण संघावर १-० गोलने निसटती मात केली. एकमेव गोल विश्‍व विख्यात लियोनेल मेस्सी याने ९१ व्या मिनिटाला केला.
जर्मनीविरुध्द खेळताना घाना संघाने अपेक्षेपेक्षा जास्त दमदार खेळ सादर करुन जर्मनी संघावर प्रचंड दडपण आणले. दोन्ही संघांचा खेळ अप्रतिम होता. पण गोल करण्यात दोघांनाही यश मिळू शकले नाही. जलपानास खेळ थांबला तेव्हा ०-० अशी गोलस्थिती होती.
उत्तरार्धात एकूण चार गोल नोंदले गेले. घानाने चार वेळा जर्मनीच्या गोलवर हल्ले रचले, तर दुसरीकडे जर्मनीने घानावर आठ जबरदस्त आक्रमण रचले. याचाच अर्थ एकूण १२ हल्ले दोन्ही संघांकडून रचण्यात आले होते. यावरुनच खेळातील आक्रामकता दिसून येते. १२ पैकी दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलरक्षकांवर तीन-तीन जबरदस्त हल्ले केले. पण दोन्ही संघातील संरक्षण फळीतील खेळाडूंनी अथवा गोलरक्षकांनी हे हल्ले शिताफिने परतवून लावले.
या गटातील पहिल्या सामन्यात हिरो ठरलेल्या थॉमस म्युलर याने खेळातील ५१ व्या मिनिटाला दिलेल्या सुंदर पासवर मारियो याने हेडिंगवर गोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर गोल न होता चेंडू गुडघ्याला लागून घानाच्या गोलस्तंभात शिरला व जर्मनी संघाला १-० ची आघाडी मिळाली. पण ही आघाडी जर्मनीला फार काळ टिकवून ठेवता आली नाही. ५४ व्या मिनिटाला घानाच्या हॅरिसन आफूल याच्या क्रॉस पासवर आंद्रे आयेव्ह याने हेडिंगवर गोल करुन सामना १-१ ने बरोबरीत आणला. यानंतर घानाने जर्मनीवर जबरदस्त हल्ला रचला व खेळातील ६३ व्या मिनिटाला इसामोआह म्यान याने गोल करुन घानाला २-१ ने आघाडीवर नेले.
जर्मन संघातील विश्‍व विख्यात खेळाडू क्लोसे याला खेळातील ६९ व्या मिनिटाला बदली खेळाडूच्या रुपात मैदानात उतरविले. तो येताच जर्मनी संघात उत्साह पसरला व खेळातील ७२ व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर किकवर क्लोसे याने गोल झळकवून लढत २-२ ने बरोबरीत आणली. क्लोसे याने नोंदविलेला गोल त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. चार विश्‍व करंडकात ब्राझीलचा पेले, जर्मनीचा सीलर यानंतर क्लोसे हा असा खेळाडू ठरला, ज्याने चारही विश्‍व करंडकात गोल केले आहेत. विश्‍व स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक १५ गोल करणार्‍या ब्राझीलच्या रोनाल्डोची बरोबरी जर्मनीच्या क्लोसे याने केली.
जलपानानंतरच्या २० मिनिटांच्या खेळात दर्शकांना चार अप्रतिम गोल बघण्याचे भाग्य लाभले. सामना २-२ ने बरोबरीत सुटल्याने घानाला अंतिम १६ संघात धडक देण्याची संधी आहे.
कुईआबा येथे झालेल्या अन्य सामन्यात घानाला बलाढ्य जर्मनीने २-२ ने रोखले आफ्रिका चॅम्पियन नायजेरियाने फिफा विश्‍वचषकात पहिल्यांदा खेळणार्‍या बोस्निया हजेर्गोविनाला १-० ने मात देत, बाहेरचा रस्ता दाखविला. नायजेरियाने १९९८ नंतर फिफा विश्‍वचषकात पहिल्यांदा विजय नोंदविला. पीटर ओडेविंगीने फिफा विश्‍वचषकातील आपल्या दुसर्‍या सामन्यात (२९ व्या मिनिटात) एकमेव गोल केला. या विजयासोबत नायजेरिया ’फ’ गटात अर्जेंटिनानंतर दुसर्‍या स्थानी पोहोचला आहे.
अर्जेंटिनाने याआधी झालेल्या सामन्यात ईराणला १-० ने मात देत अंतिम १६ संघात प्रवेश केला आहे. नायजेरियाने त्यांच्या दोन सामन्यात एक विजय आणि एक सामना बरोबरीत सोडविल्यानंतर ४ गुण मिळविले आहेत. जर त्यांनी आपला अखेरचा सामना जिंकला तर, तर ते अंतिम १६ संघात प्रवेश करू शकतील.
आता नायजेरियाचा पुढील सामना अर्जेंटिनाविरूद्ध होणार आहे. बोस्निया विरूद्द ओडेविंगीच्या गोलने सातव्या मिनिटाआधी एडिन जेकोने २२ व्या मिनिटात बोस्नियासाठी गुण मिळवला. मात्र, हा गोल बाहेरच्या दिशेने गेल्याने त्याला अमान्य ठरविण्यात आले. सामन्यानंतर ओडेविंगीने सांगितले की, हा विजय आमच्या प्रदर्शनासाठी प्रभावी असू शकतो. कारण यामुळे आता अंतिम १६ संघात स्थान मिळविण्याचा विश्‍वास वाटतो. बोस्नियाने आपल्या गटातील दोन्ही सामने गमाविल्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13717

Posted by on Jun 22 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2412 of 2455 articles)


साल्वा डोर, [२१ जून] - येथील एरेना फोंटे नोवात झालेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेतील लढतीत बलाढ्य फ्रान्स संघाने स्वित्झर्लंड संघावर ...

×