|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.4° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 38 %

वायू वेग : 8.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.23°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे

=भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे कुटुंबीय येणार=
Ghuman_Sahitya_samellnपुणे, [२२ मार्च] – पंजाबच्या घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशातील अनेक महोत्सव तेथे एकवटत आहेत. म्हणजे तेथे पंढरीची वारीही पोहोचत आहे, पंजाबमधील वैशाखीही साजरी होत आहे आणि भांगडाही सुरू आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेलेले शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय येथे आगामी ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार्‍या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी येथे दिली.
देसडला म्हणाले की, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान बहुमूल्य आहे. सायमन कमिशनचा निषेध करताना लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिशांनी लाठीहल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी या त्रिमूर्तीने जॉन सॅडहर्स्ट या इंगज अधिकार्‍याचा वध केला. त्यामुळे त्यांना २३ मार्च रोजी फासावर चढविण्यात आले. त्या क्रांतिकारकांचे वंशज नामदेवांच्या मराठीला मुजरा करण्यासाठी येत आहेत. पंजाबमध्ये नामदेवांना मान जो आहे तोच भगतसिंग व सुखदेव यांच्या बरोबरीने आपल्या राजगुरूनगरच्या शिवराम हरी राजगुरू यांनाही आहे.
भगतसिंगाचे पुतणे सरदार कुलतारसिंग यांचा मुलगा किरणजितसिंग सहारणपूर येथून येणार आहे. सुखदेव यांचे नातू अनुज थापर उत्तर प्रदेशातून येणार आहेत. राजगुरू यांचा पुतण्या सत्यशील आणि स्नुषा आरती राजगुरू पुण्यातून संमेलनासाठी येणार आहेत.

Posted by : | on : 23 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, प.महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g