Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » घोटाळे चौकशीच्या मुद्यावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादीची कोलांटउडी

घोटाळे चौकशीच्या मुद्यावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादीची कोलांटउडी

Congress-NCP-2मुंबई, [३ फेब्रुवारी] – आघाडी सरकारच्या कालावधीत झालेल्या विविध घोटाळ्यात कॉंग्रेस पक्ष वेगवेगळी भूमिका मांडत असल्याचे दिसत आहे. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, तर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अडकलेले माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात विविध यंत्रणेने चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. यामुळे दोन्ही कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांची पाठराखण करीत सरकारवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला असता, मात्र कॉंग्रेस पक्ष आपल्या नेत्यांवर झालेली कारवाई हा अन्याय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांवर झालेली कारवाई ही न्यायालयाच्या निर्देशानुसार असल्याचे सांगत कोलांटउड्या मारताना दिसत आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीयांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सरकारच्या तपास यंत्रणेने कारवाई सुरू केली आहे, तर आदर्श घोटाळ्याप्रकरणी खा अशोक चव्हाण यांच्यावरही सीबीआयने खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्यामुळे दोन्ही कॉंग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात होत असलेल्या कारवाईविरोधात खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. मात्र या संदर्भात कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करत असल्याचे समर्थन करीत आदर्श प्रकरणी सरकार अशोक चव्हाण यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेस पक्ष आपल्या नेत्यांच्या पाठीशी खंबीर उभे असले तरी मित्र पक्षाच्या नेत्यावरील कारवाईवर मात्र, कॉंग्रेस आनंदी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26716

Posted by on Feb 4 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (863 of 2451 articles)


नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] - नव्या वर्षात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला सुगीचे दिवस आले असून अधिकाधिक कंपन्या आता डिजिटायझेशनवर भर ...

×