Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » चर्चा, संवाद संसदेचा आत्मा

चर्चा, संवाद संसदेचा आत्मा

=पंतप्रधान मोदी यांचे मत=
narendra_modi11नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा आणि संवाद हाच संसदेचा आत्मा असल्याने यासाठी संसदेशिवाय दुसरे चांगले व्यासपीठ नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी व्यक्त केले.
योग्य विचार, योग्य चर्चा आणि सर्वोत्कृष्ट तसेच नाविण्यपूर्ण कल्पना या अधिवेशनात पाहायला मिळतील, असा विश्‍वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन आज गुरुवारपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी संसद भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.
चर्चा आणि संवाद साधण्यासाठी संसदेपेक्षा दुसरे मोठे व्यासपीठ दुसरे कोणतेही नाही. चर्चा, वादविवाद आणि संवाद हाच संसदेचा खरा आत्मा आहे. अन्य गोष्टी आणि राजकीय लढ्याकरिता मैदान म्हणून संपूर्ण देश आपल्यासाठी आहेच, असे त्यांनी हसतच सांगितले.
बुधवारी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सर्वच नेते उपस्थित होते. जनहिताचे निर्णय घेणे घेणे शक्य व्हावे, यासाठी संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्याचे आवाहन मी विरोधकांना केले. मला खात्री आहे की, या देशातील सर्व राजकीय पक्ष देशहितालाच प्राधान्य देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25766

Posted by on Nov 27 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1142 of 2453 articles)


=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन, आमिर खानच्या वक्तव्याचा खरपूस समाचार= नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

×