Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » चिदम्बरम् यांचे कृत्य राष्ट्रविरोधी

चिदम्बरम् यांचे कृत्य राष्ट्रविरोधी

=इशरत जहॉं प्रकरण, किरेन रिजिजू यांचे टीकास्त्र=
Kiran Rijijuनवी दिल्ली, [१८ एप्रिल] – इशतर जहॉं बनावट चकमक प्रकरणात संपुआ सरकारने तिला दहशतवादी ठरविणारे जे शपथपत्र हायकोर्टात दाखल केले होते त्याला तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनीही हिरवी झेंडी दाखविल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे चिदम्बरम् यांचे पितळ उघडे पडले आहे.
महिनाभरातच दाखल करण्यात आलेल्या दुसर्‍या शपथपत्रात इशरत जहॉंला निर्दोेष ठरविण्यात आले होते, हे विशेष. संबंधित शपथपत्र अधिकार्‍यांनी दाखल केले व आपल्याला याची कल्पना नव्हती, असा दावा चिदम्बरम् यांनी केला होता. चिदम्बरम् यांचे हे कृत्य राष्ट्रविरोधी असल्याची टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
एका इंग्रजी वाहिनीने माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या दस्तावेजांवरून हा खुलासा झाला आहे. इशरत जहॉं तोयबाच्या आत्मघाती पथकाची सदस्य असल्याचा दावा करणार्‍या शपथपत्राला स्वत: चिदम्बरम् यांनीच २९ जुलै २००९ रोजी हिरवी झेंडी दाखविली होती. परंतु, महिनाभरातच त्यांनी याप्रकरणी सुधारित शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. इशरतला क्लीन चिट देणारे शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय राजकीय स्तरावर अर्थात मंत्र्यांनी घेतला असल्याचे माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी आधीच स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे इशरत प्रकरणातील फाईलमधून २८ पाने गायब असून, त्यामध्येच या प्रकरणाचे गूढ दडले असल्याचे मानले जात आहे. दुसरे शपथपत्र सादर करण्याची गरज का भासली हे या दस्तावेजांवरून स्पष्ट झाले नाही.
इशरत प्रकरणात हा नवा खुलासा झाल्यानंतर सरकार आणि भाजपाने कॉंग्रेस व चिदम्बरम् यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. चिदम्बरम् यांनी गृहमंत्री म्हणून आपल्या कर्तव्याचे योग्य प्रकारे पालन केले नाही. एखादा गृहमंत्री अतिरेक्याला निर्दोष कसे काय ठरवू शकतो, असा सवाल रिजिजू यांनी उपस्थित केला. चिदम्बरम् यांच्या या कृत्यामुळे सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचले, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याच्या एका प्रकरणाला अशाप्रकारे वळण देऊन चिदम्बरम् यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले असून, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27886

Posted by on Apr 19 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (470 of 2453 articles)


=पर्रीकर यांची चीनला सूचना= बीजिंग, [१८ एप्रिल] - प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दोन्ही देशांना मान्य होईल, अशा पद्धतीने निश्‍चित करायला हवी. ...

×