Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

boycott-made-in-chinaनागपूर, [६, ऑक्टोबर] – आपण सगळे जाणताच की सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर अतिशय तणाव आहे. पाकिस्तानने आश्रय दिलेल्या अतिरेक्यांनी १८ सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला आणि त्यात आमचे १९ शूर जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतवर्ष दु:खी झाले, समाजमन संतप्त झाले. पाकिस्तानी भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
भारताने या हल्ल्याचा बदला घ्यावा आणि पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी संपूर्ण देशातून झाली होती. जनआक्रोश वाढला होता. जनमताची दखल सरकारनेही घेतली अन भारतीय लष्कराने गुलाम काश्मिरात घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईची माहिती लष्कराच्या अधिकृत प्रवक्त्याने संपूर्ण भारतवासीयांना दिली अन देशाने लष्कराच्या शूर जवानांचे अभिनंदन केले. ज्या कारवाईची गरज होती, ती सरकारने केली. अपवाद वगळता देश सरकारसोबत उभा ठाकला.
पण, आपला शेजारी असलेल्या चीनला भारताची ही ताकद रुचली नाही. भारताच्या कृतीचे स्वागत करण्याऐवजी चीनने पाकिस्तानची बाजू घेतली. जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या मसूद अझरच्या बाबतीतही चीनने युनोत व्हेटो पॉवर वापरून पाकिस्तानची, पर्यायाने दहशतवादाचीच बाजू घेतली. या चिनी ड्रॅगनचे फूत्कार अतिरेकी पाकिस्तानच्या दिशेने जाण्याऐवजी भारतालाच घायाळ करीत आहेत. ही बाब आमचा राष्ट्राभिमान दुखावणारी आहे. चीनमधून भारतात होणारी वस्तूंची आयात सर्वात जास्त आहे. चीनसोबत होणारा आपला व्यापार तोट्यात आहे. आयात जास्त आणि निर्यात कमी असे या व्यापाराचे स्वरूप आहे. भारतातून चीनमध्ये जाणारा पैसा म्हणजे एका अर्थाने दहशतवादाला अप्रत्यक्षपणे मदतच आहे त्यामुळे राष्ट्रभावना दुखावणार्‍या चीनलाही आता धडा शिकवण्याची गरज आहे.
चीनमध्ये उत्पादित होणार्‍या वस्तूंवर भारतीय नागरिकांनी बहिष्कार घालावा आणि राष्ट्रभावना अधिक प्रखर करावी, असे आवाहन तरुण भारत समस्त नागरिकांना करीत आहे. चीनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू विकत घेऊ नये, त्या वस्तूंची होळी करावी आणि चीनला कठोर संदेश द्यावा, असे आवाहनही आम्ही नागरिकांना करीत आहोत.
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी, शाळा-महाविद्यालयांनी पथनाट्य आयोजित करावे, चीनमुळे भारतीय उद्योजकांचे कसे नुकसान होत आहे आणि आपल्याकडे बेरोजगारी कशी वाढत आहे, याची माहिती कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण समजाला करून देणे आजच्या परिस्थितीत आवश्यक झाले आहे.
चिनी मालावर बहिष्कार, हे मोठे धारदार शस्त्र आहे. कोणत्याही रक्तपाताशिवाय ही लढाई लढायची असल्याने आणि प्रत्यक्ष रणमैदानावर जायचे नसल्याने प्रत्येकाने या लढाईत आपला सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रभावना मजबूत करावी, असे आवाहन तरुण भारत आपल्याला करीत आहे.
तरुण भारतच्या वतीने आज, शुक्रवार, दि. ७ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत दररोजी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यासाठी विविध प्रकारचा मजकूर प्रकाशित केला जाणार आहे. आपण तो अवश्य वाचावा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपले सक्रिय योगदान द्यावे, एवढीच माफक अपेक्षा!

Short URL: https://vrittabharati.in/?p=29345

Posted by on Oct 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (81 of 2453 articles)


=शरीफांचा लष्कराला इशारा= इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] - भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व ...

×