Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनकडून पाकला मिळणार ११० लढाऊ विमाने

चीनकडून पाकला मिळणार ११० लढाऊ विमाने

=जिनपिंग यांच्या भेटीत झाला करार, भारतासाठी धोक्याची घंटा=
pak-china1इस्लामाबाद, [२५ एप्रिल] – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अलीकडील पाकिस्तान दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठीच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या असून, यापैकी एका संरक्षणविषयक करारानुसार चीन पाकिस्तानला ११० लढाऊ विमानांचा पुरवठा करणार आहे. भारतासाठी ही घडामोड धोक्याची घंटाच ठरणार आहे.
‘जेएफ-१७ थंडर’ या जातीची ही अत्याधुनिक विमाने असून, यातील ५० विमानांचा पुरवठा आगामी तीन वर्षातच करण्यात येणार आहे. तथापि, उर्वरित ६० विमानांचा पुरवठा नेमका केव्हा होईल, याबाबत चीनच्या संरक्षण मंत्रालयाने कोणतीही माहिती दिली नाही. चीनमधील प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रकाशित केले आहे.
या लढाऊ विमानांची निर्मिती करणार्‍या चीनमधील उद्योगाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने चीनच्या एका दैनिकाला सांगितले की, जिनपिंग यांच्या पाक भेटीच्या काळात दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करार झाले होते. त्यात लढाऊ विमानांचा पुरवठा करणार्‍या कराराचाही समावेश आहे. याअंतर्गत पाकला ही विमाने देण्यात येणार असून, यामुळे पाकची लढाऊ क्षमता आणखी वाढणार आहे.
विशेष म्हणजे, या विमानांची निर्मिती पाकमध्येही केली जाते. कारण, या विमानांचे तंत्रज्ञान चीनने पाकला आधीच दिले आहे. पण, या प्रक्रियेसाठी दीर्घ कालावधी लागणार आहे आणि तालिबान्यांविरोधात आक्रमक लढा देण्यासाठी पाकला या विमानांची तातडीची गरज असल्याने आम्ही या देशाला विमानांचा तातडीने पुरवठा करणार आहोत, असे अधिकारी म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22251

Posted by on Apr 26 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1757 of 2458 articles)


=सुप्रीम कोर्टाची केंद्र, राज्यांना नोटीस= नवी दिल्ली, [२५ एप्रिल] - ‘इंडिया’ हे नाव बदलवून या देशाला त्याच्या ‘भारत’ याच मूळ ...

×