Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनची अर्थव्यवस्था कोलमडली

चीनची अर्थव्यवस्था कोलमडली

china-map-flagबीजिंग, [१९ जानेवारी] – चीनची अर्थव्यवस्था कोलमडत असून, २०१५ मध्ये विकासदर सात टक्क्यांच्याही खाली म्हणजे ६.९ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २५ वर्षातील हा निच्चांक आहे. २०१४ मध्ये हा दर ७.३ टक्के होता. जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
२०१५ साठी चीनने सात टक्के विकास दराचे लक्ष्य निर्धारित केले होते. अर्थव्यवस्था संथ गतीने प्रगती करीत असल्याचे पंतप्रधान ली केकियांग यांनी मान्य केले असले, तरी भविष्यात तिला रुळावर आणण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. चीनच्या शेअर बाजारात सतत घसरण होत आहे. जगातील गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यात जवळपास ६०० अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. दरम्यान, भारत दरवर्षी सात टक्के विकासदर गाठेल आणि येणार्‍या दहा वर्षात जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था ठरेल, अशी आशा हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26598

Posted by on Jan 20 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (891 of 2458 articles)


=गोवा पोलिसांना मिळाले पत्र= पणजी, [१९ जानेवारी] - भारतात आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या इसिस या जहाल दहशतवादी ...

×